सावखेडा मराठ येथे बनावट डांबर चा कारखाना उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:00 PM2021-04-28T23:00:30+5:302021-04-28T23:00:53+5:30
सावखेडा मराठ येथे असलेला बनावट डांबर तयार करण्याच्या खान्यावर बुधवारी पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यातील सावखेडा मराठ येथे असलेला बनावट डांबर तयार करण्याच्या खान्यावर बुधवारी जळगाव जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी छापा टाकून त्या ठिकाणी ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी सरकार तर्फे पोलीस उपनिरीक्षक संदिप सुरेश पाटील यांनी फिर्याद दिली की २८ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना प्राप्त गोपनिय माहिती नुसार समाधान लोटन चौधरी रा. हा इसम पारोळा नजीक महामार्ग क्रमांक ६ वरुन डांबर वाहतुक करणाऱ्या डांबर टँकर चालकांशी संपर्क साधुन संगनमत करून त्यांना सावखेडा मराठ ता. पारोळा शिवारात हायवे रोड लगत असलेल्या हॉटेल संकेत ढाब्याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत नेवुन वाहनातून डांबराची चोरी करुन त्यांना बनावट डांबर देत असे.
असे बनवायचा बनावट डांबर
या ठिकाणी टँकरमध्ये पाढऱ्या रंगाचे सिरामिक (मार्चल) पावडर मिश्रीत करुन ते गावटी भट्टीत तापवुन त्यापासून बनावट डांबर तयार करुन त्याची कााळ्या बाजारात विक्रीकरत असे. प्राप्त माहितीनुसार सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पोलीस उप निरीक्षक, विशाल नोगो सोनवणे, पोहेकॉ राजेश प्रभाकर चौधरी, रविंद्र सुकदेव मोतीराया ,निलेश माधवराव पाटील यांनी एक वाजता अचानक छापा टाकला. त्या ठिकाणी एक डांबर वाहतुक करणारे डांबर ने भरलेले टेंकर क्रमांक एम. एच. १९ झेड. ५३०२ उभे होते. त्यातुन पाईप लावुन तेथे उपस्थित असलेले दोन ईसम टॅकरमधुन डाबर काढून ते बनावट तयार केलेल्या भट्टीत काढतांना रंगेहाथ सापडले. त्यांना पोलिसांची चाहुल लागताच दोन्ही ईसम लगतच्या शेतातुन पळुन गेले . मुख्य आरोपी समाधान लोटन चौधरी रा. पारोळा, टॅंकर चालक गोकुळ मोहन शिंदे जळगाव, किशोर अभिमन तायडे धामणगांव ता. जळगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले . आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होत.
हे साहित्य केले जप्त
८०,००० रु किमतीचे एक चौकोनी आकाराची लोखंडी पत्र्याची डांबर गरम करण्याची बनावट भट्टी , २०,००० रु.कीमतीचे एक डिझेल जनरेटर , १३,००.००० रु.कीमतीचे एक सुमारे १२ हजार लिटर क्षमता असलेले लोखंडी टॅकर, १८,७१,००० कीमतीची डांबर वाहतुक करण्याचे टँकर, ३०,००० रूपये कीमतीच्या बनावट डांबर तयार करण्यासाठी लागणारे पाढऱ्या रंगाची पावडरने भरलेल्या १५० गोण्या, एक हजार कीमतीचे पाच लोखंडी बॅरल, ७००० रूपये कीमीतीचे एक १०० लिटर मापाचे प्लास्टिकची डिझेलने भरलेली टाकी डिझेलने , ८,००,००० अशोक लेलंड कंपनीचे १२ टायर डांबर वाहतुक करण्याचे टँकर असा एकूण ४२ लाख नऊ हजार कीमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.