कुलगुरूंच्याही नावे फेक व्हॉट्सॲप अकाऊंट

By अमित महाबळ | Published: December 6, 2023 07:46 PM2023-12-06T19:46:02+5:302023-12-06T19:47:11+5:30

याबाबतीत पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

fake whatsapp account in the name of vice chancellor too in jalgaon | कुलगुरूंच्याही नावे फेक व्हॉट्सॲप अकाऊंट

कुलगुरूंच्याही नावे फेक व्हॉट्सॲप अकाऊंट

अमित महाबळ, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नावे बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यात आले असून, याबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या निवेदनात म्हटले आहे, की कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नावे एका मोबाइल क्रमांकावरून बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यात आले असून, त्यावर प्रा. माहेश्वरी यांचा फोटो आहे. वास्तविक हा क्रमांक प्रा. माहेश्वरी यांचा नाही. या क्रमांकावरून काही संदेश आल्यास अथवा पैशाची मागणी झाल्यास कोणत्याही प्रकारे पैसे पाठवू नये, असे आवाहन विद्यापीठाने निवेदनाद्वारे केले आहे. याबाबतीत पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

Web Title: fake whatsapp account in the name of vice chancellor too in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.