चाळीसगावात स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी विकासाचे ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:13 PM2017-08-17T13:13:21+5:302017-08-17T13:14:09+5:30
डॉक्टरांचे दातृत्व : ई-लनिर्ंगची केली सुविधा
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 17 - त्या शाळेत कधी काळी त्यांनी ज्ञानाचे धडे गिरवलेले..वडील शिक्षक असल्याने त्यांचे बोट पकडून केलेली मौज..पुढे ते डॉक्टर होतात..मात्र त्यांच्या मनात घर करून असलेली शाळा त्यांना आजही खुणावते. शाळेच्या याचे रुणातून मुक्त होताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद कोतकर यांनी स्वातंत्र्यदिनी जि.प.च्या तरवाडे येथील शाळेत ई-लनिर्ंग क्लासरुमची स्वखर्चाने उभारणी करुन दिली. एकप्रकारे विद्यार्थी विकासाचे ध्वजारोहरणच या निमित्ताने त्यांनी केले.
मुरलीधर कोतकर हे डॉ. विनोद कोतकर यांचे वडील. ते निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांनी तरवाडे येथे नोकरी केली आहे. त्याकाळात डॉ. विनोद यांनी याच जि.प.च्या शाळेत ज्ञानार्जन करुन पुढे स्त्रीरोग तज्ज्ञ हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
सामाजिक उपक्रम
डॉ. विनोद कोतकर यांनी गेल्या चार वषार्पूर्वी आई फाउंडेशनची स्थापना करुन सामाजिक उपक्रम सुरू केले. आरोग्य, शिक्षण, सामाजिक यासह सांस्कृतिक उपक्रमही ते राबवितात. शिक्षकांसह ग्रामस्थांनीही डॉ. कोतकर यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. प्रोजेक्टवर मोठय़ा आकारातील बाराखाडी, पुस्तकातील चित्र पाहताना विद्यार्थी हरखून गेले. यावेळी डॉ. चेतना कोतकर उपस्थित होत्या.