पडाल, पण जिद्दीने उठा आणि ध्येय पूर्ण करा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:12+5:302021-01-08T04:49:12+5:30
जळगाव : एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून आवड असली की आपण शंभर टक्के जीव ओतून, धडपडत करत ते काम करतो. पडलो ...
जळगाव : एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून आवड असली की आपण शंभर टक्के जीव ओतून, धडपडत करत ते काम करतो. पडलो जरी तरी जिद्दीने उठतो. हेच मॅरेथॉन बद्दल आहे. एकदा मॅरेथॉन मध्ये पळायला सुरुवात केली की स्वयं प्रेरणेने आपण पळत जातो अगदी न थांबता, न थकता असे प्रतिपादन असे सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ.संदीप काटे यांनी केले.
दीपस्तंभ फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थी पालक व शिक्षकांसाठी नुकतीच ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून काबरा, बी.के. धूत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. काटे यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी बालपण ते सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक या प्रवासाचे संपूर्ण वर्णन केले. त्यात त्यांनी अभ्यासाची मला तशी खूप आवड होती. सगळ्याच गोष्टी थोडा सक्रिय असल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व बारावीला मला कमी मार्क झाले. माझा कॉलेजला नंबर लागला नाही म्हणून मी इंजिनिअरिंग कडे वळलो. पण योगायोगाने मेडिकल कॉलेजच्या लास्ट लिस्टमध्ये माझा नंबर लागला व प्रवेश मिळाला. वर्ध्याला शिकत असताना मी युनिव्हरसिटीत टॉपर होतो नंतर मास्टर ऑफ सर्जन केले तिथून माझ्या व्यवसायिक डॉक्टर पेशाला सुरुवात झाली आणि आज मूळ व्याधीवरील तज्ञ सर्जन म्हणून मी रुग्णांची सेवा करू शकत आहे याचा मला खरच आनंद वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.