आंध्रतील केळीमुळे जळगावातील केळी भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 09:44 PM2018-04-07T21:44:07+5:302018-04-07T21:44:07+5:30
उन्हाची तीव्रता वाढताच रावेर तालुक्यातून आवक वाढली
आॅनलाईन लोकमत
रावेर, दि.७ : आंध्रप्रदेशातील दर्जेदार केळीची कमी भावात होणारी उपलब्धता व उन्हामुळे वाढलेली आवक यामुळे केळी भावात घसरण होत आहे. वाढत्या तापमानात केळी टीकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अधिरता पाहता व्यापाºयांनी कृत्रिम मंदीचे सावट निर्माण केल्याने शेतकरीवगार्तून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
यंदाच्या हंगामात अत्यल्प पावसाळ्यातील कमालीची अनियमितता व तापमानाचा ४३ सेल्सिअंश तापमानापर्यंत सरकलेला पारा पाहता, नवतीबागांमधाल केळीची आवक मोठ्या झपाटट्याने वाढली आहे.
आपल्याकडील वाढलेली आवक तथा आंध्रप्रदेशातील दर्जेदार केळीची कमी दरात होत असलेली उपलब्धता पाहता आंध्रप्रदेशातील केळीने बाजारपेठेत सद्दी कायम राखली आहे. परिणामत: बाजारात सद्यस्थितीत मंदीचे कृत्रिम सावट पसरल्याचे आढळून येत आहे. केळीची वाढत्या तापमानामुळे आवक वाढत असली तरी, तापमानात केळीला सुरक्षित टीकवून ठेवण्यासाठी शेतकºयांची होत असलेली अधिरता व विक्रीसाठी सुरू असलेली धडपड पाहता व्यापाºयांनी रावेर केळी बाजारभाव समितीकडून घोषित भावाला स्थानिक व्यापाºयांडून चुना लावला जात असल्याची शोकांतिका आहे. कृत्रिम मंदीमुळे मात्र दर्जेदार केळी खरेदी करण्यासाठी आॅन दिले जाणारे केळीभावांनाही आता कात्री लागली आहे. केळी बाजारभाव समितीच्या भावात तो माल खरेदी केला जात आहे. गुणवत्तेत काहींशी तफावत असलेल्या केळीला रास फरक न देता प्रतिक्विंटल १०० ते २०० रूपये कमी भावाने खरेदी करीत आहे.