अग्निशमनच्या गाड्या पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:17 AM2020-12-31T04:17:07+5:302020-12-31T04:17:07+5:30

जळगाव : मनपा प्रशासनाने अग्निशमनच्या चार नवीन गाड्या खरेदी केल्या. पंधरा दिवसांपूर्वी या गाड्यांचे लोकार्पण महापौरांच्या हस्ते करण्यात ...

Falling fire trucks | अग्निशमनच्या गाड्या पडून

अग्निशमनच्या गाड्या पडून

Next

जळगाव : मनपा प्रशासनाने अग्निशमनच्या चार नवीन गाड्या खरेदी केल्या. पंधरा दिवसांपूर्वी या गाड्यांचे लोकार्पण महापौरांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, अजूनही फायर स्टेशनवर या गाड्यांची रवानगी करण्यात आलेली नाही. महाबळमधील फायर स्टेशन तयार होऊन वर्ष झाले आहे. अद्यापही ते सुरू करण्यात आलेले नाही. मनपात गाड्या धूळ खात पडू देण्यापेक्षा तत्काळ फायर स्टेशनला जमा करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी केली आहे.

आदर्शनगर भागात उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई करा

जळगाव : शहरातील तांबापुरा भागातील सार्वजनिक शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तांबापुरा भागातील नागरिक आदर्शनगरातील मोकळ्या जागेवर उघड्यावर शौच करत असल्याची तक्रार भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी केली आहे. आदर्शनगर तत्काळ हगणदरीमुक्त करण्याची मागणी चव्हाण यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. तसेच आरोग्य विभागाने तत्काळ या भागात लक्ष देण्याचाही सूचना चव्हाण यांनी केली आहे.

हरभऱ्यावर किडचा प्रादुर्भाव

जळगाव : डिसेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसला होता. त्याचा परिणाम आता ही जाणवू लागले आहेत. हरभऱ्यावर कीडचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यासह मक्यावरदेखील आतापासूनच अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, कडाक्याचा थंडीमुळे गव्हाला फायदा होत आहे.

विनाशास्ती मालमत्ता कर भरण्याची आज शेवटची मुदत

जळगाव : मालमत्ता कराचा भरणा विनाशास्ती भरण्याची गुरुवारी शेवटची मुदत आहे. यंदा कोरोनामुळे मनपाच्या मालमत्ता कराची वसुली केवळ ४० टक्के झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराची रक्कम भरण्याची मुदत आहे, तर १ जानेवारीपासून मालमत्ता कराच्या रक्कमेवर २ टक्के शास्ती भरावी लागणार आहे. गुरुवारी मालमत्ताकराची रक्कम भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू

जळगाव : शासनाकडून तूर खरेदीला लवकरच सुरुवात होणार असून, यासाठी जिल्ह्यात दहा खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांना यासाठी नोंदणी करावी लागणार असून, बाजार समितीत ही नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी आधारकार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. दरम्यान, यंदा तुरीला सहा हजार रुपये प्रतीक्विंटल हमीभाव देण्यात आला आहे.

वाळू माफियांवर लगाम

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून गिरणा नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपश्यावर आता महसूल प्रशासनाने काही प्रमाणात प्रतिबंध घातला आहे. निमखेडी भागात रात्रीच्या वेळेस काही प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. मात्र, आव्हाणे, आव्हाणी या भागात वाळू उपस्यावर बऱ्याच अंशी लगाम घालण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच महसूल प्रशासनाच्या पथकाकडूनदेखील गिरणा पात्रात नेहमीच पाहणी केली जात आहे.

Web Title: Falling fire trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.