जळगावात भाजीपाल्याची आवक वढाल्याने भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:16 PM2018-12-14T13:16:44+5:302018-12-14T13:17:16+5:30

टमाट्याच्या भावात ३०० रुपये प्रती क्विंटलने घट

Falling prices due to inward supply of vegetables in Jalgaon | जळगावात भाजीपाल्याची आवक वढाल्याने भावात घसरण

जळगावात भाजीपाल्याची आवक वढाल्याने भावात घसरण

Next

जळगाव : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढून भाव झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्याच्या भावात ३०० रुपये प्रती क्विंटलने घट होऊन लाल टमाटे ७०० रुपये प्रती क्विंटलवरून ४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. सोबतच कांदा, भेंडी, कारले, वांगे यांचे भाव कमी झाले आहे. एरव्ही हिवाळ््याच्या सुरुवातीपासून टमाट्याचे भाव कमी होत असतात. मात्र मध्यंतरी टमाट्याची आवक कमी होऊन गेल्या महिन्यात भाव वाढ होऊन ते १५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते. मात्र या आठवड्यात टमाट्याचे भाव थेट ३०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ८५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या कांद्याचे भाव कमी होऊन ते ७५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.
भेंडीचे भाव ५०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते १५००, कारल्याचे भाव ३०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते १५०० रुपयांवर आले आहेत. या सोबतच गेल्या आठवड्यापासून वांग्याची आवक वाढलेली असून वांग्याचे भाव ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. कोथिंबीरचेही २५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. पत्ता कोबी २० रुपये प्रती किलो, फूलकोबी ३० रुपये प्रती किलो, हिरवी मिरची २० रुपये प्रती किलो, मेथीची भाजी १० रुपये जुडी विक्री होत आहे.

Web Title: Falling prices due to inward supply of vegetables in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.