अभद्र आघाडीला ठेंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:34 PM2017-11-29T13:34:55+5:302017-11-29T13:37:56+5:30

सोयीच्या राजकारणासाठी एकत्र आलेल्या राजकारण्यांना मतदारांनी  धडा  शिकविला

Falls will lead the alliance! | अभद्र आघाडीला ठेंगा !

अभद्र आघाडीला ठेंगा !

Next
ठळक मुद्देअभद्र  आघाडीला मतदारांनी ठेंगा दाखविलापारोळा तालुक्यात भाजपचे मजबूत असे संघटन नाही

सोयीच्या राजकारणासाठी एकत्र आलेल्या राजकारण्यांना मतदारांनी  धडा  शिकविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील व भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांनी एकत्र येत पारोळा शेतकी संघाच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्याचा प्रय} केला. मात्र या पाटीलद्वयींच्या अभद्र  आघाडीला मतदारांनी ठेंगा दाखविला.  पारोळा आणि भुसावळ तालुका शेतकी संघाच्या   निवडणुका झाल्या. यात पारोळा येथे शिवसेनेने सर्वच्या सर्व म्हणजे 15 जागा जिंकून वर्चस्व कायम ठेवले आहे. तर भुसावळात भाजपचे आमदार संजय सावकरे यांच्या गटाला 8 तर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटाला 7 जागा मिळाल्या.  शेतकी संघाची ही निवडणूक गाजली ती पारोळ्याच्या निमित्ताने. इथे शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील  यांच्या विरोधात   भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन टोकाचे दोन पक्ष या निवडणुकीत एकत्र आले.  मात्र चिमणराव पाटील यांच्या आघाडीला कौल मिळाला.   पारोळा तालुका शेतकी  संघ हा गेल्या 25 वर्षापासून  माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या ताब्यात आहे. यापूर्वी संघाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. आता 25 वर्षानंतर प्रथमच मतदान झाले.   कर्ज नसलेला शेतकी संघ असा  प्रचार चिमणराव पाटील यांनी केला,  आणि त्यास मतदारांनीही  प्रतिसाद दिला.  पाटील हे जिल्हा  बँक आणि जिल्हा दूध संघ अशा दोन्ही  ठिकाणी संचालक आहेत. ते माजी मंत्री एकनाथराव  खडसे यांच्या जवळचे मानले जातात. पारोळ्यात त्यांना रोखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी  काँग्रेस एकत्र आले. त्यामुळे मतदारांच्याही भुवया  उंचावल्या. कारण आतार्पयत खासदार ए.टी. पाटील व आमदार डॉ.सतीश पाटील  हे एकमेकांच्या विरोधात होते. आता ते एकत्र कसे? असा प्रश्न मतदारांनाही पडला असावा. हाच राग मग मतदानातून व्यक्त झाला असावा, अशी चर्चा आता पारोळा तालुक्यात रंगू लागली आहे. एका मतदाराने मतदान पत्रिकेत चक्क   ‘सर्वच पुढारी चोर  आहेत’, असे  लिहून आपला संताप व्यक्त केला. शेतकी संघासाठी चिमणराव हे गेल्या काही दिवसापासून तयारी करीत होते. त्याचे  फळ त्यांना  मतदानातून मिळाले. दुसरीकडे मतदानाच्या काही दिवस आधी पाटीलद्वय एकत्र आले.   उलट पारोळा शेतकी संघासाठी चिमणराव पाटील यांनी काही लाखाचे कर्ज घेतले आहे,  शेतकी संघ कर्ज  विरहित असल्याचे चिमणराव हे खोटे सांगत असल्याचा प्रचार खासदार ए.टी.पाटील व डॉ. सतीश पाटील यांनी  केला. मात्र त्याचा काहीही परिणाम होऊ शकला नाही. या आरोपांनी उलट  शिवसेनेचे फावल्याचे म्हटले जात आहे. या दोघांनी मिळून जोर लावला असता तर कदाचित सोसायटी मतदार संघात किमान तीन जागा त्यांच्या पॅनलला मिळू शकल्या असत्या. पण हे दोन्ही  नेते आरोप करीत राहिले, दुसरी बाजू मांडण्यात कमी पडले. दुसरी महत्त्वाची बाब  म्हणजे पारोळा तालुक्यात भाजपचे मजबूत असे संघटन नाही, त्याचा फायदा शिवसेनला झाला.  भुसावळातही आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी हे दोन तगडे नेते शेतकी संघाच्या निमित्ताने आमने-सामने आले होते. पारोळ्यात  शेतकी संघ निवडणूक एकतर्फी झाली तरी तर  भुसावळात अटीतटीची. भाजपसाठी ही राजकीय  तर चौधरी यांच्यासाठी  ही अस्तित्वाची निवडणूक ठरली. 
 

Web Title: Falls will lead the alliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.