मृत धान्य दुकानदाराच्या कुटुंबांना आर्थीक मदत मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:52+5:302020-12-11T04:42:52+5:30
जळगाव : कोरोनाने निधन झालेल्या स्वस्त धान्य दुकानदार संजय नामदेव झोपे यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी शहरी ...
जळगाव : कोरोनाने निधन झालेल्या स्वस्त धान्य दुकानदार संजय नामदेव झोपे यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी शहरी व ग्रामीण सरकार मान्य रेशन दुकानदार संघटनेने केलेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवदेन देण्यात आले आहे.
संजय झोपे हे मार्च महिन्यापासून नियमती आपल्या लाभार्थ्यांना आत्मनिर्भर योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अंत्योदय योजना, सर्व योजनांअंतर्ग धान्य वाटप करीत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे ८ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखलीची असून त्यांना आर्थीक मदत मिळावी, अशी मागणी संघटनेततर्फे करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष अनिल अडकमोल, कार्याध्यक्ष नवनाथ दारकुंडे, उपाध्यक्ष फिरोज पठाण, नरेंद्र पाटील, रत्नमाला काळुंखे, अतुल हराळ आदींची उपस्थिती होती.