उसनवारीच्या पैशांवरुन महिलेसह कुटुंबियांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 08:07 PM2020-08-26T20:07:59+5:302020-08-26T20:08:23+5:30

गुन्हा दाखल : धनादेश न वटल्याने केली मारहाण

Family members, including a woman, were beaten to death over loan money | उसनवारीच्या पैशांवरुन महिलेसह कुटुंबियांना बेदम मारहाण

उसनवारीच्या पैशांवरुन महिलेसह कुटुंबियांना बेदम मारहाण

Next

जळगाव : उसनवारीने दिलेले पैसे परतफेडीसाठ दिलेला दोन लाखाचा धनादेश न वटल्याने त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या बिलकीस आरीफ पटेल (३५, रा.रुबी अपार्टमेंट रामनगर) यांना व कुटुंबियांना सात ते आठ जणांनी लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी भावना जवाहरलाल लोढा (३८,रा.अयोध्यानगर), सईदाबी फारुख पटवे (४०) व मुजाहीद फारुख पटवे (१८) दोघे रा. रा. शिरसोली नाका यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २० आॅगस्ट रोजी ही घटना घडली होती.

बिलकीस पटले यांनी ओळखीतून ३० आॅक्टोंबर २०१९ रोजी भावना लोढा यांना ११ महिन्यांनी परत करण्याच्या बोलीवर एक लाख रुपये उसनवारीने दिले होते. याबाबत बिलकीस पटेल यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून घतले होते. तसेच याबदल्यात भावना हिने एक लाख रुपयांचा धनादेशही दिला होता. १ नोव्हेंबर २०११ रोजी भावना हिने एक लाख रुपये मागितले. अशाप्रमाणे बिलकीस पटेल यांनी भावना लोढा हिस एकूण २लाख रुपये दिले. याबदल्यात भावना हिने पटेल यांना २ लाखांचा धनादेश दिला होता. यानंतर फेब्रुवारी महिन्यात पैसे परत मागितले असता भावनाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. यानंतर बिलकीस यांनी भावना हिने दिलेला दोन लाखांचा धनादेश बॅकेत जमा केला असता, तो वटला नाही.
पैसे परत मागितले असता मारहाण
बिलकीस पटेल या भावना हिच्या घरी गेले असता, लोढा यांनी अश्‍लिल शिवीगाळ करत वाद घातला. पैसे मागितल्यास मी स्वत:चा जीव देवून पोलिसात खोटी तक्रार करेन अशी धमकी दिली. यानंतर बिलकीस पटेल यांचा पैशांसाठी पाठपुरावा सुरु होतचा. यात २० आॅगस्ट रोजी भावना लोढा यांच्यासह फारुख पटवे व मुजाहीद फारुख पटवे व सात ते आठ जण बिलकीस पटेल यांच्या घरी आले. त्यांनी पटेल यांना त्यांच्या घरात घुसून बिलकीस पटेल यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना लोखंडी पाईपने मारहाण केली. यात बिलकीस पटेल यांच्या आईस दुखापत झाली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकीही संबंधितांनी अशा आशयाच्या बिलकीस पटेल यांच्या फियार्दीवरुन भावना लोढा यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

Web Title: Family members, including a woman, were beaten to death over loan money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.