कुटुंब हळदीच्या कार्यक्रमाला अन् घरातून पावणेदोन लाखांचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:24+5:302021-03-25T04:16:24+5:30

पिंप्राळा येथील घटना : दरवाजाची कडी उघडून चोरी जळगाव : कुटुंब घरासमोर हळदीच्या कार्यक्रमाला गेले आणि चोरट्यांनी प्रशांत अनिल ...

The family removed the turmeric program from the house with jewelery worth Rs | कुटुंब हळदीच्या कार्यक्रमाला अन् घरातून पावणेदोन लाखांचे दागिने लांबविले

कुटुंब हळदीच्या कार्यक्रमाला अन् घरातून पावणेदोन लाखांचे दागिने लांबविले

Next

पिंप्राळा येथील घटना : दरवाजाची कडी उघडून चोरी

जळगाव : कुटुंब घरासमोर हळदीच्या कार्यक्रमाला गेले आणि चोरट्यांनी प्रशांत अनिल चौधरी यांच्या बंद घराची कडी उघडून पावणेदोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पिंप्राळ्यातील इंद्रनील सोसायटीत २२ मार्च रोजी घडली. याप्रकरणी बुधवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील इंद्रनील सोसायटीतील रहिवासी प्रशांत अनिल चौधरी (वय २३) हे कुटुंबियांसह राहतात. १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी सोन्याचे दागिने घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. २२ मार्च रोजी दुपारी ५ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या सपना काळे यांच्याकडे हळदीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने प्रशांत चौधरी यांची आई आशा चौधरी घराला कडी लावून कार्यक्रमाला गेल्या. त्याच वेळेत चोरट्यांनी घराची कडी उघडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, २५ ग्रॅमचे गळ्यातील हार व पदक, ११ ग्रॅमो सोन्याचे कानातले चाप आणि २० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या, असा एकूण १ लाख ७१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सायंकाळी आशा चौधरी या घरात आल्यावर लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीला आले. प्रशांत चौधरी यांच्या फिर्यादीवरून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार गोपाल चौधरी करीत आहेत.

Web Title: The family removed the turmeric program from the house with jewelery worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.