बेवारस फिरणाऱ्या वृद्धेला पुन्हा मिळाला कुटुंबाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 08:17 PM2020-04-13T20:17:38+5:302020-04-13T20:17:59+5:30

माणुसकीचे दर्शन : तिघांच्या प्रयत्नांना आले यश

The family reunited with the helpless old man | बेवारस फिरणाऱ्या वृद्धेला पुन्हा मिळाला कुटुंबाचा आधार

बेवारस फिरणाऱ्या वृद्धेला पुन्हा मिळाला कुटुंबाचा आधार

Next


भुसावळ : कोरोना व्हायरस सारख्या परिस्थितीत सुध्दा पत्रकार आपली भूमिका अतिशय महत्त्वाची बजावत आहेत. जळगाव जिल्ह्यातील वृत्तवाहिनीचे पत्रकार इम्तियाज अहमद व मंगेश जोशी तसेच छायाचित्रकार श्याम गोविंदा या तिघांच्या प्रयत्नांनी गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर झालेल्या एका दिनदुबळ्या वृद्ध महिलेची आपल्या कुटुंबासोबत भेट घडवून देत माणुसकी जोपासली.
याबाबत वृत्त असे की, निजामपूर (जि.धुळे) येथील ७० वर्षीय वृध्द महिला रंजनाबाई दत्तात्रय चिंचोले ही १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून विभक्त होत भटकत होती. याबाबतचे वृत्त नुकतेच ‘लोकमत’ ने प्रकाशित केले. दरम्यान या तिघा पत्रकारांनी प्रयत्न केल्याने त्या वृद्ध महिलेचे भाऊ व नातेवाईक हे तिला घेण्यासाठी सोमवारी भुसावळ येथे आले होते. नगरपालिका रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करून या वृद्ध महिलेला जिल्हा सीमेवर त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केले. याबद्दल त्या माहिलेच्या भावाने लोकमत व भुसावळातील या तीन्ही पत्रकारांचे आभार मानले.

Web Title: The family reunited with the helpless old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.