पारोळा येथे ग.स.सोसायटीचा कुटुंबाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 02:38 PM2020-01-05T14:38:08+5:302020-01-05T14:39:48+5:30

ग.स.सोसायटील कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या मुलास दहाव्या दिवशीच सेवेत घेऊन ग.स. सोसायटीने कुटुंबाला आधार दिला आहे.

Family support of GS Society at Parola | पारोळा येथे ग.स.सोसायटीचा कुटुंबाला आधार

पारोळा येथे ग.स.सोसायटीचा कुटुंबाला आधार

googlenewsNext
ठळक मुद्देवडिलांच्या निधनानंतर दहाव्या दिवशी मुलगा सेवेतग.स.सोसायटीचा पुढाकार

रावसाहेब भोसले
पारोळा, जि.जळगाव : ग.स.सोसायटील कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या मुलास दहाव्या दिवशीच सेवेत घेऊन ग.स. सोसायटीने कुटुंबाला आधार दिला आहे.
ग़ स़ सोसायटीमधील कर्मचारी अभिमन्यू मधुकर काटे यांचे दुर्दैवी निधन झाले़ घरचा कर्ता आधार गेला कुटुंब सुन्न झाले. यात ग़स़ सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास नेरकर, विद्यमान अध्यक्ष मनोज पाटील व संचालक सुनील अमृत पाटील यांनी ग़ स़ सोसायटीच्या माध्यमातून या कुटुंबाला आधार द्यावा लागेल यासाठी लगेच निर्णय घेतला की अभिमन्यू काटे हे आपल्या संस्थेचे कर्मचारी होत़े म्हणून अनुकंपाच्या जागेवर मुलगा अंकीत याला नोकरीत सामावून घ्यावे़ कोळपिंप्री, ता़पारोळा येथील वडिलांच्या निधनानंतर दहाव्या दिवशीच मुलगा अंकीत याला ग़ स़ सोसायटीत नोकरीत सामावून घेतले आणि नातेवाईक समोर अंकीत याला नियुक्तीचा आदेश दिला आणि या माध्यमातून एक माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला़
यावेळी मुलगा अंकित अभिमन्यू काटे यास अनुकंपा तत्वावरील नेमणुकीचे आदेश विलास यादवराव नेरकर ग़स़चे अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष श्यामकांत भानुदास भदाणे, संचालज सुनील अ. पाटील, सुनील निंबा पाटील, व्यवस्थापक संजय ठाकरे आदी उपस्थित होते़

Web Title: Family support of GS Society at Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.