दुष्काळात रामफळांनी म्हटले, हे राम..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 03:39 PM2019-04-12T15:39:52+5:302019-04-12T15:40:22+5:30

वातावरणाचा फटका : दिवसेंदिवस दुर्मीळ रामफळांचा गोडवा हरवतोय

In the famine, Rafal said, "O Ram! | दुष्काळात रामफळांनी म्हटले, हे राम..!

दुष्काळात रामफळांनी म्हटले, हे राम..!

Next


खेडगाव ता. भडगाव : आज रामनवमी..राम जन्मोत्सवाच्या काळात पिकतं... त्याचा गोडवा चाखावयास मिळतो म्हणुन प्रभुरामचंद्रांचे नाव धारण करणारे रामफळ. रणरणत्या उन्हात, रुक्ष वातावणात या फळाचा स्वाद अवीट असाच. मात्र दुष्काळी परिस्थितीचा व रोगट हवामानाचा फटका या फळालाही बसला असून हे फळ सध्या अत्यल्प दिसत आहे.
विविध जीवनसत्वांनी युक्त
तपकीरी, केशरी रंगाचे हे फळ आकर्षक असेच.अ,ब,क, जी वनसत्वे पोटॅशिअम ,मँग्नेशिअम युक्त. मधुमेह,कर्करोग प्रतिबंधक, पचन सुधारक म्हणुन आरोग्यदायी फळ. रामफळाची बाग तशी दुर्मीळच.वाडवडिलांनी शेताच्या बांधावर वाढीस लावलेली रामफळांची झाडे हेच काय त्यांचे अस्तित्व. मात्र एक-दोन सालागणिक येणाऱ्या दुष्काळाने रामफळेही संकटात सापडले आहेत. हवामान बदलाने यावर्षी कडुनिंबावर आळी पडली.रामफळालाही या बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे.
रागफळांची अनेक
झाडे वाळली
शिशीरात पाने झडणे,वसंत ऋतुत पालवी फुटणे या निसर्ग सुलभ प्रक्रियेत बाधा येत,यंदा फळ पोसले नाही.ऐन फळ पक्व होण्याच्या काळात झाडावर पालवी नाही.त्यामुळे आहे ती रामफळे उन्हात काळी पडलीत. कमी पाऊस राहीलेल्या भागात ही झाडे वाळली आहेत. पाणी मुबलक असलेल्या ठिकाणची रामफळे निघत असली तरी तापमानामुळे या फळाची गोडी व चव देखील काहीशी बदलल्याचे शेतकरी सांगतात.

Web Title: In the famine, Rafal said, "O Ram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.