कुंकवाचा धनी गेला, काळ्या आईनं धीर दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:01 PM2018-03-08T13:01:42+5:302018-03-08T13:01:42+5:30

farm patronized | कुंकवाचा धनी गेला, काळ्या आईनं धीर दिला

कुंकवाचा धनी गेला, काळ्या आईनं धीर दिला

googlenewsNext

संजय हिरे / आॅनलाइन लोकमत
खेडगाव, जि. जळगाव, दि. ८ - एक'आशा,.. एक 'उर्मी, ला..!.: शेतकरी पतीच्या निधनानंतर वैधव्याच्या कुºहाडीनिशी 'त्या, लढताहेत जिवनाचा लढा शेतकरी आत्महत्या..काळ्या आईच्या उजळलेल्या कुसेला मिळालेला भंयकर शाप..! मातीतून सोनं उगवणा-या भुमीपुत्राच्या संसाराची राखरांगोळी करणारा आजचा ज्वलंत विषय. निसर्गाचे दृष्टचक्र, नापिकी, कजार्चा डोंगर या भाराने भुमीपुत्र हरला मात्र उदरात अंकुर फुलवणाºया सृजनावर विश्वास ठेवणा-या शेतकरी मायाबहिणी अकाली कोसळलेल्या वैधव्याच्या कुºहाडीनिशी जीवनसंघर्षात हार न मानता काळ्या आईच्या आधारावर हिमंतीन लढत आहेत. पिचर्डे, ता. भडगाव येथील राखेतून संसार उभ्या करणा-या आम्ही दोघींच्या ही फिनीक्स गाथा.
शिकल्या सवरलेल्या पोरीबाळींचे ज्या वयात लग्न देखील होत नाही अशा तीस-पस्तीसच्या वयात पतीने आत्महत्या केल्यान ंतर हार न मानता त्या उभ्या राहील्या.
मिळून 'चौघीजंणी, ...!
आशाबाई आनंदा पाटील. २०१५ मधे कजार्पायी पतीनं आत्महत्या केली. दीड एकर शेती. पोटी तीन मुली. पैकी दोन उपवर. एक शाळकरी. मुलगा नाही. चौकोनी कुटुंब पण हिंमत हरली नाही.पती निधनाच्या वेळेस दीड लाखाचे कर्ज होते. दीड एकर शेती कसली. इतर वेळेस दुस-यांच्या शेतावर कामावर जात पै-पै जमा केली. दोन मुलींचे लग्न केले. मागील वर्षी अर्धा घरहिस्सा विकला. अडीच लाखांचे खाजगी कर्ज घेतले. टुमदार घर बांधले.
घेतलेले कर्ज फेडण्याची घमेंड आहे. एक मुलगी दहावी शिकतेय. पती निधनाचे शल्य आजही दु:ख देते पण मुलींसाठी जगायचं आहे. हा निर्धार. घरातील भिंतीवर पती आनंदा पाटील यांच्या फोटोसमोर आठवणींना उजाळा देत जणुकाही तुम्ही हरलात मी मात्र हार न मानता लेंकीसांठी आयुष्य कंठतेय. शेतकरी आत्महत्यामधून वैधव्याची कु-हाड कोसळणा-या शेतकरी मायाबहिंणीची उमेद जागवणारी ही 'आशा, बाई मिळुन चौघी जंणीचे जग सावरतेय.
भाऊबंदांचा साथ
पिचर्डे येथीलच दुसरे कुंटुंब. प्रवीण उत्तम पाटील.पाच एकर वाडिलोपार्जीत शेती. कर्ज कुणावर नसते.पण थोड्याफार कजार्पायी हाय खाल्ली .तीन वषार्पुर्वी जीवन संपविले. पत्नी उर्मिला पाटील यांच्यासह एक वषार्चा मानव व चार-पाच वर्षाचा मुलगा सचिन पोरके झाले. पतीचे भाऊ मच्छींद्र पाटील,विश्वास पाटील विभक्त असलेत तरी एकत्र कुटुंब पद्धतीतील एक विचाराने कुटुंब तरले. तीन एकर शेती पुतण्या किशोर, गणेश यांच्यासमवेत कसण्यास सुरवात केली.
भावाच्या मागे भाऊबंधांनी कुटुंबावर मायेची सावली धरली. पती निधनानंतर त्यांनी मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेत घातले. शेती कसणे सोपे नव्हे. मातीशी गाठ असते. अनेक जण 'ती, त मिळाले. आपल्यावर वैधत्व येउनही काळ्या आईला ‘हिरवा चुड्या’ चे भाग्याचे लेणे मिळवून देणे त्याहुनही कठीण.! इथे आशाबाई, उर्मिला बाई त्यासाठी धडपडताहेत.

Web Title: farm patronized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.