चोपड्यात शेतमजूर, बांधकाम कामगारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:24 AM2019-08-31T01:24:03+5:302019-08-31T01:24:22+5:30
लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर, बांधकाम मजूर, गरजू प्लॉटधारकांचा मोर्चा काढण्यात आला.
चोपडा, जि.जळगाव : येथे लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर, बांधकाम मजूर, गरजू प्लॉटधारकांचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व भारतीय शेतमजदूर युनियनचे राष्ट्रीय कमेटी सभासद अमृत महाजन, युनियनचे जिल्हा सचिव गोरख वानखेडे, खजिनदार निंबाजी बोरसे, किसानसभा हातेडचे अध्यक्ष सुनील बाविस्कर, सुनील बोहरा आदींनी केले.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे १० शेतमजुरांची हत्या करण्यात आली. त्याचा व जम्मू-काश्मीरमध्ये जनतेचे मत विचारात न घेता ३७० व ३५ अ कलम रद्द करण्यात आले याचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चा तहसीलदार कार्यालयावर गेल्यावर नायब तहसीलदार पंजे यांना या निषेधासह शेतमजुरांच्या सविस्तर १४ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात शेतमजूर, आदिवासी बांधकाम मजुरांचे प्रश्न सोडवा आणि नवीन वीज मीटर ग्राहकांची लूट थांबवा, दुचाकीधारकांचे रेशन बंद करू नका, रेशनधान्य सुरू ठेवा, डीबीटी योजना बंद करा. शेवरे बुद्रूक आदिवासीना मारहाण करणाºया वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करा. वनाधिकार कायदा, पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी. वढोदा , अजंतीसीम येथील भिल्ल आदीवासीना घरकूले द्या, मोहिदा भिल्लवस्तित रस्ता ,दिवाबत्ती, गटार, सपाटीकरण ,घरकूले बांधकाम आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, बचत गटांना कर्जे द्या अंगणवाड्यांचे खाऊ शिजवणे बचत गटांकडेच सुरू ठेवा. तसेच हातेड खुर्र्द व काजीपुरा येथील गरजू बेघरांना प्लॉटचे ताबे द्या. ताबे न दिल्यास येत्या १२ सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. काजीपुरा सरपंच रवींद्र पवार, वासुदेव कोळी, जिजाबाई राजपूत, राजेंद्र पाटील, रतिलाल भिल, मंगल भिल, अरमान तडवी, एकनाथ वाणी, रघुनाथ बाविस्कर, दौलत वाघ, ठगूबाई कुंंभार, चमेलाबाई शिंदे, सुनील कोळी, भूषण कोळी, शिवाजी पाटील, किशोर सोनवणे, बाबूलाल वाणी, अरिफखान, प्रल्हाद मोरे, प्रेमचंद पारधी यांचा समावेश होता.