शेतक:याने बांधला स्वखर्चाने बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 01:06 AM2017-01-24T01:06:41+5:302017-01-24T01:06:41+5:30
आजूबाजूच्या रहिवाशांनाही लाभ : गुढे येथील कामगिरीने अनेकांना लाभ, जलपातळीत वाढ
गुढे, ता. भडगाव : गेल्या दोन- तीन वर्षामधील पाणीटंचाई पाहता सामाजिक जाणिवेतून येथील यशवंत भिला पाटील या शेतक:याने स्वत: एक लाख रुपये खचरून गुढे- कोळगाव रस्त्याच्या बाजूलास असलेल्या नाल्यावर कच्चा बंधारा बांधला आहे. यामुळे पावसाळ्यातील पाणी अडवले जाऊन परिसरातील जलपातळी सुधारण्यास मदत झाली आहे. यामुळे परिसरात या कामाचे कौतुक होत आहे.
या नाल्याच्या आजूबाजूचे 150 ते 175 एकर परिसरातील शेतकरी पाण्याअभावी अनेक वर्षापासून तळमळत होते. भर उन्हाळ्यात गुरांनादेखील पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले होते. ही बाब लक्षात घेता यशवंत पाटील यांनी हा कच्चा बंधारा बांधला आहे. यामळे शेतीसाठी व गुरांसाठी उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध राहणार आहे. या ठिकाणी 25-30 घरांची वस्ती असून त्यांनाही या बंधा:याचा लाभ झाला आहे.
उन्हाळ्याची नेहमीची पाणी समस्या या बंधा:यामुळे सुटण्यास मदत होणार असल्यामुळे परिसरातील शेतकरी व वस्तीतील कुटुंबामध्ये समाधान पसरले आहे. (वार्ताहर)
गेल्या तीन वर्षात उन्हाळ्यात या परिसरात खूपच पाणीटंचाई जाणवली. लोकांचे खूपच हाल झाले. ही परिस्थिती लक्षात घेत पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधला. सुदैवाने पावसाळा चांगला झाल्याने पाणी चांगलेच साचले आहे. याचा लाभ सर्वानाच होईल याचा आंनद आहे. -यशवंत पाटील