शेतकरी, व्यापारी होणार ‘बेलगंगे’चे मालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 01:02 AM2017-01-14T01:02:44+5:302017-01-14T01:02:44+5:30
चाळीसगाव : चित्रसेन पाटील यांची माहिती
चाळीसगाव/जळगाव : केंद्र सरकारच्या एम. एस. टी. सी. विभागाच्या ‘बेलगंगा’ सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत अंबाजी ट्रेडिंग कंपनीने सहभाग घेऊन सर्वाधिक ३९ कोटी २२ लाख १ रुपया अशी बोली लावली. निविदेपोटी भरावयाचे ३ कोटी ९२ लाख रुपये अदा केले.
कारखाना हा तालुक्याच्या जिव्हाळ्याचा विषय असून तो लोकसहभागातून येत्या गळीत हंगामात सुरु करणार आहोत.
यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांना मालक होण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केले. बेलगंगा हा स्थानिक भूमीपुत्रांनीच सुरू करावा.
याबरोबरच तो लोकसहभागातून कार्यरत होत असल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे व बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे- खेवलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याचा उल्लेख करताना पाटील यांनी लोकसहभागाची प्रक्रिया विषद केली़
संचालक मंडळ घेणार अंतिम निर्णय
४जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील बेलगंगा सहकारी साखर कारखान्याची ई निविदेव्दारे लिलाव प्रक्रिया झाली. मात्र याप्रश्नी अंतिम निर्णय हा जिल्हा बँकेचे संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
४शासनाच्या एका एजन्सीकडून कारखाना विक्री करण्याच्या प्रयत्नांना पहिल्यांदाच जिल्हा बँकेला यश आले आहे. यापूर्वी जिल्हा बँकेने स्वत: बेलगंगासह वसंत कारखाना व इतर मालमत्ता विक्री करण्याचा प्रयत्न केला मात्र अमळनेरच्या जागेव्यतिरिक्त जिल्हा बँकेला यश आले नव्हते. त्यामुळे बँकेने एजन्सीमार्फत कारखाना विक्रीकरण्याचा प्रयत्न केला आहे.
४२००२ पासून बेलगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे. म्हणून बॅँकेने आॅनलाइन पद्धतीने कारखाना विक्रीची प्रक्रिया राबविली.
बेलगंगा कर्मचाºयांची उद्या बैठक
चाळीसगाव- बेलगंगा साखर कारखाना कामगार युनियनची बैठक शासकीय विश्रामगृहात १५ रोजी आयोजित केली आहे. सभेस औरंगाबाद खंडपीठाचे अॅड. एस. एस. कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहे.
गेल्या १२ रोजी मुंबईत निविदा प्रकिया पूर्ण झाल्यानंतर सर्वात जास्त बोली ही चाळीसगाव येथील अंबाजी ट्रेडींग कंपनीची असल्याचे समोर आले. माजी चेअरमन चित्रसेन पाटील, माजी व्हाईस चेअरमन रवींद्र पाटील, निलेश निकम, डॉ. अभिजीत पाटील यांच्या अंबाजी कंपनीने लिलावात भाग घेतला होता.