यावल तालुक्यातील कोरपावली येथे शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:48 IST2020-07-22T20:46:08+5:302020-07-22T20:48:33+5:30
कोरपावली येथील घनश्याम महाजन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

यावल तालुक्यातील कोरपावली येथे शेतकºयाची आत्महत्या
यावल : तालुक्यातील कोरपावली येथील ७३ वर्षीय शेतकरी घनश्याम राजाराम महाजन यांनी मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गोठ्यातील छताच्या पाईपाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
महाजन यांना पाठदुखी व कंबर दुखीचा त्रास होता. ते आजाराने त्रस्त होते. म्हणून त्यांची पत्नी उषाबाई या मलम घेऊन गोठ्यात गेल्या असता त्यांना महाजन यांनी गळफास घेतला असल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरड केला. तेव्हा आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले. डाक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुतण्या रोहिदास यशवंत महाजन यांनी येथील पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.असलमखान करीत आहे.