मांडवे बुद्रुक येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 11:07 PM2021-05-10T23:07:02+5:302021-05-10T23:07:38+5:30

मांडवे बुद्रुक येथील ५७ वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली.

Farmer commits suicide at Mandve Budruk | मांडवे बुद्रुक येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

मांडवे बुद्रुक येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देमुलींच्या लग्नासाठी काढले होते कर्ज.

लोकमत न्यूज नेटवर्क

तोंडापूर, ता. जामनेर : मांडवे बुद्रुक येथील ५७ वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करून आपले आयुष्य संपविले.

शांताराम वामन जाधव आसे मयत शेतकऱ्याचे नाव असून, तीन मुलींचे लग्न, तसेच शेतात उत्पन्न होत नसल्याने लग्नासाठी काढलेले कर्ज व घरात लागणारा खर्ज दिवसेंदिवस वाढत गेला. सावकारी व बँकाचे कर्ज वेळेत न दिल्याने, जाचाला कंटाळून त्याने स्वतःच्या शेतात दि. १० रोजी विषप्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्याच्यापश्चात आई, वडील, पत्नी, मुली व मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Farmer commits suicide at Mandve Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.