किसान क्रेडिट कार्डाची शेतक:यांना प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 12:52 AM2017-05-06T00:52:15+5:302017-05-06T00:52:15+5:30
कसरत : थकबाकीदार शेतक:यांच्या वाढणार अडचणी, गांभीर्याने दखल घेणे गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदापासून पीक कर्ज शेतक:यांना धनादेशाद्वारे न देता, किसान क्रेडिट कार्डाद्वारे देण्यात येत आहे. यासाठी शेतकरी थकबाकीदार नसावा, तसेच यासह इतर अटी टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याआधीच पुरेसे किसान क्रेडिट कार्ड मिळत नसल्याने शेतक:यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
धरणगावात 150 कार्ड वाटप
धरणगाव येथे जिल्हा बँकेतर्फे तालुक्यातील 150 शेतक:यांना किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात आले आहे, तर शंभरावर शेतक:यांना 65 लाख कर्ज वाटप करण्यात आले. धरणगाव शाखेला संलग्न असलेल्या तालुक्यातील 16 विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना बँकेतर्फे आज किसान क्रेडिट कार्डाचे वाटप शाखा व्यवस्थापक आर.एस.बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
एरंडोलला 300 कार्ड वितरित
एरंडोल तालुक्यासाठी 2200 किसान कार्डपुरवठा पहिल्या टप्प्यात करण्यात आला असून, आठवडाभरात जवळपास 300 कार्ड वितरित करण्यात आले. सद्य:स्थितीत तालुक्यात 6 हजार 293 एवढय़ाच शेतक:यांना यावर्षी किसान क्रेडिट कार्ड वाटप होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, किसान कार्ड वाटपाला विलंब होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
13 शाखांमार्फत वाटप
भडगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत तालुक्यातील 13 बँक शाखांना एकूण 1530 किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात आले. यात भडगाव बँक शाखेला 300 कार्ड वाटप करण्यात आले. कार्डवाटपाची कार्यवाही सुरू आहे. यानंतर शेतक:यांना बँकेचे कर्ज घेता येणार आहे. बँक व्यवस्थापक बाळासाहेब पवार यांनी ही माहिती दिली.
अवघ्या 50 शेतक:यांना कार्ड
चाळीसगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत आतार्पयत 50 शेतक:यांना किसान कार्ड वाटप करण्यात आले. बँक नियमानुसार प्रत्येकी 10 हजारांप्रमाणे या कार्डावरून पैसे काढता येणार आहे. लवकरच सर्व सभासदांना कार्ड दिले जातील, असे विशाल देशमुख यांनी सांगितले.
चार हजार कार्ड वितरित
पाचोरा येथे मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 4 हजार किसान क्रेडिट कार्ड 19 शाखांना वाटप करण्यात आले. यामुळे शेतक:यांना कर्ज घेणे सोपे होणार आहे. 357 शेतक:यांना कजर्वाटप झाल्याचे बँक अधिका:यांनी सांगितले.
चार संस्थांमार्फत वितरण
मुक्ताईनगर तालुक्यातील चार विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून 49 शेतक:यांना विविध बँकांशी संबंधित किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले.
रावेरला तूर्त 1300 कार्ड
रावेर येथे जिल्हा सहकारी बँकेने तालुक्यातील 29 शाखांमध्ये तूर्त एक हजार 300 किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आले. वि. का. संस्थांच्या कर्ज मंजुरीच्या आधारे अपेक्षित कर्जदार शेतक:यांसाठी आणखी वाढीव किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जातील, असे तालुका विभागीय अधिकारी उत्तम चौधरी यांनी सांगितले.
थकीत कर्ज भरणा:यांनाच कार्ड
चोपडा येथे कॅशलेस व्यवहार व्हावेत, म्हणून जिल्हा बॅँकेने चोपडा तालुक्यातील सर्व 215 शाखांमध्ये 3 मेर्पयत 2500 शेतक:यांना किसान कार्ड वाटप केले आहेत. जे शेतकरी कागदपत्रांची पूर्तता करीत आहेत अशाच शेतक:यांना किसान कार्ड वाटप होत आहे. त्यामुळे कार्ड मिळण्यासाठी प्रतीक्षेत असणा:यांची संख्या नसल्याचे तालुका निरीक्षक डी.पी.वाल्हे यांनी सांगितले.
55 लाख रुपये मंजूर
यावल येथे जिल्हा बॅँकेच्या कार्यक्षेत्रातील निमगाव 62 व चितोडा येथील 19 अशा 81 शेतक:यांना किसान क्रेडिट कार्डाद्वारे 54 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेकडून यावल शाखेस 300 कार्ड प्राप्त झाले.
किसान कार्ड वाटपाची प्रक्रिया सप्टेंबरअखेर सुरू राहणार असल्याचे सांगून शेतकरी टप्प्याटप्प्याने हे कर्ज घेऊ शकतात, असे शाखाधिकारी एस. जे. बागुल यांनी सांगितले.
उर्वरित सभासदांनाही देणार
अमळनेर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटप शाखेतर्फे 500 शेतक:यांना किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत सर्वच सभासद शेतक:यांना येत्या 10 दिवसांत वितरण केले जाणार आल्याचे शाखा व्यवस्थापक दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले. कर्ज वाटप शाखेच्या अंतर्गत 35 संस्था येतात. त्यातील सर्व सभासद शेतक:यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप होईल.