शेतक:यांच्या मारहाणीत केबल चोराचा मृत्यू
By admin | Published: April 1, 2017 01:04 AM2017-04-01T01:04:16+5:302017-04-01T01:04:16+5:30
चोपडा : एक जण जखमी;चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा, पाच दिवस कोठडी
चोपडा : रामपुरा भागातील असलेल्या शेत शिवारातील वीज खांबावरील अॅल्युमिनियमची केबल चोरी करणा:यांना शेतक:यांनी रंगेहाथ पकडून मारहाण केली. यात सुभाष जगदीश बारेला (45, रा. हसली बोरखेडा, ता. शिरपूर) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर नाना ठाणसिंग बारेला (रा. सेंधवा) हा जखमी झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चौघांवर शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, शहरातील रामपुरा भागाजवळील शेत शिवारात 30 रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास सुभाष जगदीश बारेला व त्याचे चार साथीदार वीज खांबावरील अॅल्युमिनिअम वायर चोरत असताना शेतक:यांना दिसले. रात्री पिकांना पाणी भरणा:या शेतक:यांनी या चोरांना रंगेहाथ पकडून चोप दिला. त्यामुळे सुभाष जगदीश बारेला व नाना ठाणसिंग बारेला हे दोघे जबर जखमी झाले. शेतक:यांनी आरोपींना पकडून पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना सुभाष बारेला याचा मृत्यू झाला.
चोरीचा गुन्हा दाखल
दरम्यान, विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून मयत सुभाष बारेला, नाना बारेला व आसाराम बारेला यांच्यासह त्यांचे अज्ञात दोन साथीदार अशा पाच जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला तार चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात तीन हजार रुपये किमतीची अल्युमिनियम तार पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.
तिघांना पोलीस कोठडी
दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी विजय पाटील, मंगल माळी, भाईदास भिलाला यांना शुक्रवारी चोपडा न्यायालयात हजर केले होते. न्या. खान यांनी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलाची जिल्हा बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा विभागाचे उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे करीत आहेत.
चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल
जखमी नाना ठाणसिंग बारेला याच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला आरोपी विजय शिवाजी पाटील (27), मंगल बारकू माळी (45), भाईदास रिचा भिलाला (58), व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा.चोपडा) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.