भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार, रामदेववाडी गावाजवळील घटना

By सागर दुबे | Published: March 21, 2023 08:03 PM2023-03-21T20:03:06+5:302023-03-21T20:03:15+5:30

रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी

farmer going on two wheeler was killed in a collision with a speeding car, an incident near Ramdevwadi village | भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार, रामदेववाडी गावाजवळील घटना

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार, रामदेववाडी गावाजवळील घटना

googlenewsNext

जळगाव : पाचोराकडून जळगावकडे जाणा-या भरधाव कारने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शेतकरी ठार झाला. रमेश मदन राठोड (४५, रा. रामदेववाडी) असे मृत दुचाकीस्वार शेतक-याचे नाव असून ही घटना मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास रामदेववाडी गावाच्या काही अंतरावर घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामदेववाडी येथील रहिवासी रमेश राठोड हे मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगाव शहराच्या दिशेने निघाले होते. गावाच्या काही अंतरावर असलेल्या टेकड्यांजवळील रस्त्यावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला पाचो-याकडून जळगावकडे भरधाव जाणा-या एमएच.१९.डी.व्ही.७५१३ क्रमांकाच्या कारने ओव्हरटेकच्या नादात धडक दिली. या अपघातात राठोड यांना गंभीर दुखापत होवून ते बेशुध्द झाले.

काही मिनिटात घटनास्थळी ग्रामस्थांसह म्हसावद आउटपोस्टचे पोलिस कर्मचारी प्रदीप पाटील व स्वप्निल पाटील यांनी घटनास्थळी येवून राठोड यांना वाहनातून जिल्हा रूग्णालयात हलविले. मात्र, रस्त्यातच राठोड यांचा मृत्यू झाला. रात्री जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती. तर पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: farmer going on two wheeler was killed in a collision with a speeding car, an incident near Ramdevwadi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.