बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 06:50 PM2019-06-23T18:50:59+5:302019-06-23T18:51:36+5:30

दापोरी शिवारातील घटना

Farmer injured in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

googlenewsNext

एरंडोल : दापोरी शिवारात शेतकरी शेतात पाणी भरत असतांना बिबट्या मादीने हल्ला करून त्यास जखमी केले. सोबत शेतकऱ्याचा भाऊ असल्याने त्याचे प्राण वाचले.
योगेश सुनील म्हस्के व त्यांचा भाऊ चेतन म्हस्के कपाशीला पाणी लावत होते. एक भाऊ एका बांधावर तर दुसरा दुसºया बांधावर पाणी लावत असतांना. बिबट्या मादीने योगेश म्हस्केवर हल्ला केला. दुसºया भावाने हातात काठी घेऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु २० ते २५ फुटावर जाऊन परत ती योगेश व चेतन यांच्याकडे हिंस्त्र नजरेने रोखुन बघत होती. क्षणात दोघा भावांनी दूचाकी सुरु केली व तिचा प्रकाश मादीच्या चेहºयावर मारल्याने ती पळून गेली. चेतन व योगेश यांनी सांगितले मादी सोबत पिल्ल देखील होती. मादीला खेडी खु. व दापोरी शिवारात नागरिकांनी महिन्यापासून पहिले आहे. तिने आतापर्यंत ७ ते ८ बकºया व तिन दिवसांपूर्वी ३० ते ३५ किलो वजनाची एक मेंढी मेंढपाळच्या कळपातून फस्त केली असल्याचे सांगितले.
दरम्यान, वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पाणी नसल्याने वन्य प्राणी शेताकडे येत आहेत. वनरक्षक शिवाजी पाटील यांनी जखमी शेतकºयावर औषधोपचार करून त्यास मदत केली.
घटना स्थळाचा पंचनामा केला. लवकरच शासन स्तरावर शेतकºयास आर्थिक मदत करण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Farmer injured in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.