विमा योजनेतील शेतक:यांची माहिती अपलोड करण्याची 14 ऑक्टोबरपयर्ंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:03 PM2017-10-07T23:03:56+5:302017-10-07T23:06:47+5:30
बँकांनी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 7 - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतक:यांची माहिती संबंधित बँकांनी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक असून हे संकेतस्थळ 14 ऑक्टोबर पयर्ंतच सुरु राहणार आहे. त्यानंतर शेतकरी सहभागाची माहिती अपलोड करता येणार नाही. संकेतस्थळावर अपलोड झालेल्या शेतकरी सहभागाची माहिती फक्त केंद्र व राज्य शासनाचे विमा हप्ता अनुदान अदा करण्यास ग्राह्य धरली जाणार असून त्यानुसार संबंधित विमा कंपनीकडून सुद्धा नुकसान भरपाईसाठी विचारात घेतली जाणार आहे.
त्यामुळे सर्व संबंधित बॅकांनी योजनेत सहभागी झालेल्या शेतक:यांची माहिती 14 ऑक्टोबरपूर्वी संकेतस्थळावर अपलोड करणे गरजेचे झाले आहे. याबाबत बँकांकडून दिरंगाई झाल्यास याची जबाबदारी बँकेची राहणार असल्याचे कृषि विभागाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.