खिर्डी येथील शेतक:याची पिंप्राळ्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 05:53 PM2017-04-10T17:53:45+5:302017-04-10T17:53:45+5:30
फायनान्स कंपनीत होता कामाला. कजर्बाजारी व शेत मालाला भाव न मिळाल्याने संपविली जीवनयात्रा
Next
जळगाव,दि.10- सततचा दुष्काळ व त्यात शेत मालाला भाव न मिळाल्याने कर्जबाजारी झालेल्या चंदन भाऊराव महाजन (वय 29 रा. खिर्डी, ता.रावेर, ह.मु.पिंप्राळा, जळगाव) या तरुण शेतक:याने सोमवारी सकाळी दहा वाजता पिंप्राळ्यातील गांधी चौक परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदन हा जळगावातील एका फायनान्स कंपनीत कामाला होता.
चंदन महाजन हे प}ी नेहा यांच्यासोबत पिंप्राळ्यातील गांधी चौक येथे रवींद्र पाटील यांच्या घरात सहा महिन्यापासून भाडय़ाने राहत होते. नेहा यांच्यासोबत दोन वषार्पूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास प}ी नेहा या पिंप्राळ्यातच राहत असलेले वडील राजेंद्र केशव पाटील यांच्याकडे डबा घेण्यासाठी गेल्या होत्या.
तेव्हा चंदन हे घराच्या मागच्या खोलीत झोपलेले होते. नेहा डबा घेवून साडे दहा वाजता आल्या असता मागच्या खोलीत पतीने गळफास घेतल्याचे दिसताच रडत बाहेर आल्या. शेजारच्या रहिवाशांनी तातडीने घरात धाव घेतली तर जावयाने गळफास घेतल्याचे कळताच सासरे राजेंद्र पाटील हे देखील धावत आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.