अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; पहिल्याच पावसात गेली बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 09:29 PM2022-06-09T21:29:27+5:302022-06-09T21:29:51+5:30
गाळण आणि परिसरात सायंकाळी ५:३० वाजता वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला.
खडकदेवळा जि. जळगाव : यंदाच्या पहिल्याच पावसात एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. अंगावर वीज पडून कैलास बारकू पाटील (४६, रा. गाळण बुद्रूक ता.पाचोरा) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गाळण येथे घडली.
गाळण आणि परिसरात सायंकाळी ५:३० वाजता वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी कैलास पाटील हे आपल्या शेतीच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक विजांचा जोरदार कडकडाट होवून मोठा आवाज झाला. काही कळायच्या आत कैलास यांच्या अंगावर वीज पडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.