सरकारच्या धोरणाने शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:07 PM2018-12-08T23:07:39+5:302018-12-08T23:08:01+5:30

यंदा तर डाळींचे भाव कमी असल्याने शेतकरी हैराण

Farmer Metakutis by the government's policy | सरकारच्या धोरणाने शेतकरी मेटाकुटीस

सरकारच्या धोरणाने शेतकरी मेटाकुटीस

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : डाळींच्या बाबत सतत बदणाऱ्या धोरणासोबतच आता कांदा उत्पादकांच्याबाबतीतही सरकार धोरणात बदल करीत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
डाळीच्या आयातीसह कच्च्या मालाच्या बाबतीतही सरकार आपले धोरण बदलवित राहिल्याने डाळ उद्योगास मोठा फटका बसला. या सोबतच ग्राहकांना भाव वाढीचा फटका बसत राहिला. त्यानंतर यंदा तर डाळींचे भाव कमी असल्याने शेतकरी हैराण झाला.
आता कांदा उत्पादकांच्या बाबतीतही तसेच होत आहे. सरकारने आयातीचे धोरण राबविल्याने देशातील कांदा शिल्लक राहिला व आता नवीन कांद्यास मातीमोल भाव मिळत आहे.
आॅक्टोबर महिन्यापासून जळगावबाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यापासून दिवसेंदिवस ही आवक वाढत जाऊन गेल्या दोन महिन्यापासून कांद्याचे भाव सतत कमी होत गेले. नवीन कांद्याची आवक सुरू होताच चांगल्या दर्जाच्या कांद्याचे भाव १००० रुपये प्रती क्विंटलवर आले होते. त्यानंतर ते कमी कमी होत जाऊन ८०० रुपये प्रती क्विंटलवर आले.
चांगल्या दर्जाच्या कांद्याचे भाव कमी होत असताना दुय्यम दर्जाचा कांदा गेल्या महिन्यात २ रुपये प्रती क्विंटलवर आला होता. आताही हा कांदा कोणी घ्यायला तयार नसून कांदा उत्पादक मेटाकुटीस आले आहे. या कांद्याचे करायचे काय, असा सवाल कांदा उत्पादक करीत आहे. एरव्ही पांढºया कांद्याला मागणी जास्त नसल्याने त्यांचे भाव लाल कांद्यापेक्षा कमी असतात. मात्र आता तर लाल कांद्याची आवक वाढल्याने या कांद्याचे भाव पांढºया कांद्यापेक्षाही कमी झाले आहे. पांढरा कांदा २५० ते ९७५ रुपये प्रती क्विंटल आहे तर लाल कांद्याचे भाव ८०० रुपये प्रती क्विंटल आहे.
जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील चोपड्यासह अडावद, लासूर, किनगाव, चहार्डी या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. तसेच चाळीसगाव, यावल तालुक्यातील किनगाव व परिसरात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र हा कांदा त्या-त्या बाजार समिती व उप बाजात समितीमध्ये विक्री होत असून तेथेही कांद्याचे भाव गडगडले आहे.
मध्यंतरी पाकिस्तानमधून कांद्याची आयात केल्याने नाशिकसह अनेक ठिकाणचा उन्हाळी शिल्लक राहिला. हा कांदा विक्री होत नाही तोच नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याचे भाव कमी-कमी होत गेले.

Web Title: Farmer Metakutis by the government's policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.