तूर उत्पादकांच्या पदरी यंदाही निराशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:26 PM2018-02-04T23:26:04+5:302018-02-04T23:28:55+5:30
70 टक्के माल विक्रीनंतर खरेदी केंद्र
विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 4 - उशिरा लागवड व किडींचा प्रादुर्भाव यासह विविध कारणांमुळे आधीच कमी उत्पादन आलेल्या तुरीला यंदाही अपेक्षित हमी भाव न मिळाल्याने शेतक:यांची निराशा झाली आहे. त्यात जवळपास 70 टक्के माल शेतक:यांनी व्यापा:यांना विक्री केल्यानंतर शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होत असल्याने सरकारचे ‘वराती मागून घोडे’ असल्याचा आरोप शेतक:यांमधून होत आहे.
अस्मानी संकटापाठोपाठ सरकारकडूनही चेष्टा
उशिरा आलेल्या पावसामुळे मुळातच तुरीची लागवड उशिरा झाली. त्यात वातावरणाच्या परिणामामुळे किडींचा प्रादुर्भाव अशा कारणांमुळे तुरीच्या उत्पादनात घट आली. लागवड क्षेत्रातून अपेक्षित उत्पादनापैकी यंदा 25 टक्केही तुरीचे उत्पन्न हाती आले नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. या अस्मानी संकटांचा सामना करावा लागत असताना सरकारने जो हमी भाव जाहीर केला त्यात उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी 5400 रुपये प्रति क्विंटल भाव सरकारने दिला. त्यात यंदा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असताना किमान 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ 50 रुपयांची भर टाकून 5450 रुपये भाव देऊन शेतक:यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केल्याचा आरोप शेतकरी किशोक चौधरी यांनी केला आहे.
खरेदी केंद्रांची प्रतीक्षाच
2017-18 या हंगामासाठी तुरीची खरेदी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 9 खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी 2 रोजी अमळनेर येथील एकमेव केंद्रावर खरेदी सुरू झाली. शेतक:यांच्या मालाला भाव व बाजारपेठ मिळावी म्हणून खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असले तरी ते वेळेवर व हमी भाव देणारे नसल्याने शेतक:यांची परवडच होत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.
व्यापा:यांकडे विक्रीला पसंती
शासकीय तूर खरेदी केंद्रावर मालघेवूनगेल्यानंतर तेथे ‘एफक्यू’ दर्जाचाच माल पाहिजे, असा आग्रह असतो. परिणामी शेतक:यांची मोठी अडचण होते. यामुळे गेल्या वर्षी शेतक:यांनी चाळणीचा खर्च स्वत: करीत तूर विक्री केली. त्यामुळे यंदा तूर खरेदी केंद्रावर यांत्रिक चाळणी उपलब्ध करण्याची मागणी शेतक:यांची आहे.
यंदा तुरीचे उत्पादन घटलेअसून हमी भावातून उत्पादन खर्चही निघणार नाही. किमान 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळण्याची अपेक्षा होती. हाती पैसा नसल्याने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच शेतक:यांनी 70 टक्के तूर शेतक:यांनी विक्री केली आहे.
- किशोर चौधरी, शेतकरी तथा अध्यक्ष नवनिर्मिती शेतकरी मंडल असोदा