वीजतार पडून बैलाचा मृत्यू, शेतकरी बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 09:18 PM2019-08-26T21:18:16+5:302019-08-26T21:18:20+5:30
पारोळा : तालुक्यातील सांगवी येथे बैलगाडी घेऊन घरी परतताना तुटलेल्या विजेच्या तारेवर बैलाचा पाय पडून बैल दगावला. मात्र शेतकरी ...
पारोळा : तालुक्यातील सांगवी येथे बैलगाडी घेऊन घरी परतताना तुटलेल्या विजेच्या तारेवर बैलाचा पाय पडून बैल दगावला. मात्र शेतकरी बालंबाल बचावला. हा घटना २६ रोजी सायंकाळी घडली.
अनिल रामदास पाटील यांच्या मालकीची बैलगाडी घेवून कैलास तुकाराम पाटील हे येत असताना एक बैलाचा पाय विजेच्या तारेवर पडून बैलचा मृत्यू झाला. कैलास पाटील यांनी त्याच क्षणी गाडीवरून उडी घेतल्याने ते बचावले. तसेच दुसला बैलही गाडीपासून सोडविला.
दरम्यान, परिसरात वारंवार जनावरे वीजतारेच्या स्पर्शाने दगावल्याच्या घटना घडत आहेत. अनेकदा तक्रार देऊनही वीजमंडळ कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. याबाबत कारवाई व्हावी, असे मत मनसे तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील, नथ्थु पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बन्सीलाल पाटील, महेंद्र पाटील, दत्तू पाटील, विलास पाटील यांनी व्यक्त केले.