कर्जाला कंटाळून शेतक:याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 06:17 PM2017-08-16T18:17:42+5:302017-08-16T18:21:47+5:30

वाकडी येथील शेतक:याने कर्जामुळे उचलले टोकाचे पाऊल

Farmer tired of debt: its suicide | कर्जाला कंटाळून शेतक:याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतक:याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देस्वत:च्या शेतात ठिबकच्या नळीने घेतला गळफासमक्याला पाणी देत असताना झाले गायबवि. का. संस्थेचे होते 50 हजार रुपये कजर्

ऑनलाईन लोकमत जामनेर (जि. जळगाव) : कर्जबाजारीपणाला कंटाळून वाकडी, ता. जामनेर येथील शेतक:याने बुधवारी सकाळी स्वत:च्या शेतात ठिबकच्या नळीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश नामदेव गायकवाड (वय 50) असे या मयत शेतक:याचे नाव आहे. गायकवाड हे मुलासोबत शेतात मक्याला पाणी देत होते. पाणी देत असताना ते अचानक दिसेनासे झाल्याने मुलगा त्यांना शोधायला गेला असता त्यांचा मृतदेह बांधावर झाडाला लटकलेला आढळून आला. त्यांच्या पश्चात प}ी, मुलगा, दोन मुली आहेत. त्यांच्यावर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे 50 हजारांचे कर्ज होते, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. याबाबत पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार प्रताप मथुरे, रघुनाथ पवार तपास करीत आहे.

Web Title: Farmer tired of debt: its suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.