वाकडी येथे शेतक:याची आत्महत्या

By admin | Published: April 18, 2017 04:46 PM2017-04-18T16:46:17+5:302017-04-18T16:46:17+5:30

वाकडी, ता.जळगाव येथे धोंडू देविदास हटकर (वय 38) या तरुण शेतक:याने मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता शेतातच विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.

Farmer at Wakadi: Its Suicide | वाकडी येथे शेतक:याची आत्महत्या

वाकडी येथे शेतक:याची आत्महत्या

Next

 जळगाव,दि.18- शेतमालाला योग्य भाव न मिळणे त्यातच कर्जाचा डोंगर या सा:याला कंटाळून वाकडी, ता.जळगाव येथे धोंडू देविदास हटकर (वय 38) या शेतक:याने मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता शेतातच विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. 

धोंडू यांच्या वडिलांनी सोसायटीचे पीक कर्ज काढले असून ते थकीत आहे. कोरडवाहू शेती असल्याने उत्पन्न जेमतेमच होते. त्यातही शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडणे जिकरीचे झाले होते. मंगळवारी सकाळी शेतात जाताना धोंडू हटकर यांनी किटकनाशक औषध बाटलीत आणले होते. धोंडू यांनी विष प्राशन केल्याचे समजताच पोलीस पाटील विठ्ठल पाटील व गावक:यांनी त्यांना तातडीने रिक्षातून जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र वाटेतच त्यांचा प्राणज्योत मालवली होती. 

Web Title: Farmer at Wakadi: Its Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.