शेतकरी जाब विचारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:50+5:302021-06-27T04:12:50+5:30
कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास कुणाचाही विरोध नाही व कुणीही शेतकरी त्या भूमिकेचा नाही. मात्र, सर्व गोष्टी खुलेआम व्हाव्यात, असाही सूर ...
कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास कुणाचाही विरोध नाही व कुणीही शेतकरी त्या भूमिकेचा नाही. मात्र, सर्व गोष्टी खुलेआम व्हाव्यात, असाही सूर व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचे उसाचे घेणे असलेले १३.५ कोटी न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यावर द्यावयाचे १५ टक्के व्याजाने जवळपास ३३ कोटी रुपये झाले असून अधिकनंतर वर्षाचे व्याजासकट ३ कोटी असे एकूण ३६ कोटी कारखान्याकडे घेणे आहेत. शेतकरी त्यातील व्याजदेखील सोडायला तयार आहेत. म्हणजे २० ते २१ कोटी ते सोडायला तयार आहेत. गरज पडली तर हप्त्याला तयार आहे. शेतकरी ही मदत करून कारखाना सुरू ठेवण्याची भूमिका घेत असताना त्यांच्या उदारपणाबाबत माहिती जनतेला न देता, त्याला लाचार म्हणून तू पैसे सोडले नाहीत, तर कारखाना सुरू होणार नाही, असे चित्र जनतेसमोर उभे केेले जात असेल, तर तो त्यांच्या औदार्याचा अपमान केला जात आहे, अशी भावनाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कारखाना कसा बुडाला, त्याला कोण जबाबदार? हे सारे विसरून तो सुरू होण्यासाठी शेतकरी साथ देत असताना जे कारखाना घेणार आहेत, त्यांच्यासमोर येथील शेतकरी किती चांगला आहे, हे सांगून चांगले वातावरण तयार करण्याऐवजी, उलट शेतकऱ्यांना तुम्ही पैसे मागणार, तर कारखाना दिला जाणार नाही व भविष्यातदेखील नुकसान होणार, या भीतीपोटी आम्ही सांगू तसे निर्णय घ्या, नाहीतर कारखाना सुरू होणार नाही, अशी चर्चावजा धमकी दिली जात आहे. त्याबाबत सोशल मीडियावरील संदेशात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.