उतावळी नदीवर पुलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 02:21 PM2019-08-08T14:21:26+5:302019-08-08T14:22:11+5:30
पुल उभारण्यात यावा या मागणीसाठी शेतशिवारातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी चक्क उतावळी नदीपात्रात उतरुन संताप व्यक्त केला.
कुºहाड ता.पाचोरा-येथील पाचोरा रोडवरील आदर्श हायस्कुलच्या मागील बाजुस वाहत असलेल्या उतावळी नदीवर पुल उभारण्यात यावा या मागणीसाठी शेतशिवारातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी चक्क उतावळी नदीपात्रात उतरुन संताप व्यक्त केला.
या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात शेतकºयांना शेतात जाण्यासाठी याशिवाय दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने अडचणी निर्माण होतात. यावर्षी तर दररोज उतावळी नदीच्या उगमस्थानावर थोडाही पाऊस झाल्यास नदीला पुर येतो. यामुळे येण्याजाण्याचा मार्ग बंद होऊन शेतकºयांना पुर ओसरण्याची वाट पहावी लागते. मजुर, शेतकºयांना बेलगाडीसह पावसाळ्याच्या दिवसात पाणी असलेल्या या नदीपात्रातुनच जावे लागत असल्याने याठिकाणी लहानमोठे अपघात होत असतात.
या ठिकाणी दहा वषार्पासुनची पुल उभारण्याची मागणी असुन एखाद्याचा जीव जाण्याची तर शासन वाट पाहत नाही ना ? असा संतप्त सवाल या शेतकºयांनी केला.
निवेदने देऊन ही लक्ष दिले जात नाही.
संभाव्य धोका टाळण्यासाठी या ठिकाणी लवकर पुल तयार करुन शेतकºयांची गैरसोय दुर व्हावी या मागणीसाठी अनेकदा निवेदन दिले परंतु लक्ष दिले गेले नाही. दरम्यान शंभर ते दिडशे शेतकºयांच्या सहीचे निवेदन या मतदारसंघाचे आमदार गिरिष महाजन यांना देण्यात आले.