जळगाव जिल्ह्यात कांदा अनुदानासाठी तीन हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 05:29 PM2019-02-01T17:29:49+5:302019-02-01T17:31:14+5:30
कांदा अनुदानासाठी जिल्ह्यात ३१ जानेवारीअखेर तीन हजारावर शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
गोंडगाव, ता. भडगाव, जि.जळगाव : कांदा अनुदानासाठी जिल्ह्यात ३१ जानेवारीअखेर तीन हजारावर शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
राज्य सरकारने कांदा अनुदान योजनेत शेतकºयांना अनुदानासाठी १५ डिसेंबर २०१८ पर्यंत विक्री केलेल्या कांद्यासाठी अर्ज करण्याची देण्यात आलेली मुदत १५ दिवसांनी वाढविली. १५ डिसेंबर २०१८ पर्यंत विक्री झालेल्या कांद्यासाठी करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार होते, मात्र आता ही मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांना वाढीव मुदतीचा लाभ घेऊन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सद्य:स्थितीत ३१ जानेवारीअखेर जिल्ह्यात तीन हजार १३७ शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समित्यांमध्ये १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रु आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रतिशेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर केले आहे.
तथापि, १५ डिसेंबर २०१८ नंतरही कांद्याला मिळणारे बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानाचा कालावधी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वाढविण्याची मागणी शेतकरी, शेतकरी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकºयांमध्ये आनंद दिसून येत आहे.
कांदा अनुदानासाठी मुदतवाढ
कांदा अनुदानाचा कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंत निश्चित करण्यात आला होता. सदर कालावधी वाढवून सुधारित कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजेच १५ दिवसांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
यावर्षी कांद्याने फार मोठ्या प्रमाणात रडविले. शासनाने अनुदानातदेखील तुटपुंजी वाढ केली. अनुदानात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची तरी वाढ अपेक्षित होती. परंतु मुदतवाढ झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
-विजय परदेशी, शेतकरी, नावरे, ता.भडगाव