शेतकरी आत्महत्या करतोय, कंपनी विषयी नाही,भावावर बोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 01:19 PM2019-01-03T13:19:41+5:302019-01-03T13:19:58+5:30
पाशा पटेल यांना सुनावले शेतकऱ्याने खडे बोल
जळगाव : तुम्ही, बड्या कंपन्यांचा विषय करता त्या शेतकºयांना लुबाडतात. शेतकºयांच्या गट कंपन्या स्थापन करण्यापूर्वी हमी भावाचे बोला, कापसाचे भाव का वाढले नाहीत... शेतकºयावर आतमहत्येची वेळ का येते? कापूस प्रश्नावरून उपोषणास करणारे मंत्री महाजन यांची सध्याची भूमिका काय? असे खडे बोल डिगंबर बडगुजर (चिंचोली ता.यावल) या शेतकºयाने राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना बुधवारी सुनावले.
जिल्हा कृषि विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी कापूस उत्पादक शेतकरी व जिनिंग कंपनी प्रतिनिधींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात पटेल यांची उपस्थिती होती. कापूस उत्पादक शेतकºयांनी टेबल वाजवून शेतकºयाच्या या भूमिकेला दाद दिली. अचानक झालेल्या शाब्दीक माराने पटेल हेदेखील अवाक झाले होते.
पाशा पटेल यांनी मनोगत व्यक्त केले व कापूस क्षेत्रात ज्यांनी वेगळे उपक्रम राबविले अशांनी बोलावे अशी सूचना केली. त्यानंतर ही ठिणगी पडली. शेतकरी डिगंबर बडगुजर हे म्हणाले, तुम्ही एसीत बसतात व भाषणे करतात. अगोदर भाव का मिळत नाही यावर बोला... असे सुनावले. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह तुम्हाला आणि शासकीय अधिकाºयांनाही वाटते की शेतकºयांचे भले व्हावे. मग आज शेतकºयांच्याच विषयावर बोला. शेतकरी ५० क्विंटल कापूस पिकवतो असे सांगता तरीही त्याच्यावर आत्महत्येची वेळ का येते? शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, यासंदर्भात तुम्ही बोला असे ते वारंवार सांगात होते. यावेळी पटेल यांनी विषयांतर करु नका... मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो. अशी विनवणी करीत हा विषय इथेच संपविण्याची सूचना केली. त्यावर शेतकरी बडगुजर हे शांत झाले. यानंतर ही बैठक दोन तास चालली.
अहो शेतकºयाची बायको चांगली साडे नेसू शकत नाही
कपाशी उत्पादक शेतकरी किशोर चौधरी (असोदा) यावेळी म्हणाले, आम्ही पिढीजात कापूस उत्पादक आहोत. शेतीत आमचे रक्त सांडले पण नव तंत्रज्ञान मिळाले नाही. गरीब ते गरीबच राहिलो. अहो शेतकºयाची बायको कधी चांगली साडी नेसू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करूनही नव तंत्रज्ञान मिळाले नाही. यासाठी काही तरी करा, मुक्ताईनगर येथील शेषराव पाटील हेदेखील तक्रार मांडण्यास उभे राहीले असता त्यांना बसण्यास सांगण्यात आले. बोदवड येथील निलेश पाटील यांनी कापूस संशोधन केंद्र (नागपूर) कडे काही विषय घेऊन गेले असता साधा प्रतिसाद मिळाला नाही. पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांकडे जास्त लक्ष दिले जाते अशी तक्रारही त्यांनी केली. पाळधी येथील जिनिंग व्यावसायिक सोमाणी यांनी एकरी उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान शेतकºयांना दिले जावे असे मत मांडले. तर शेवगे बुद्रुक ता. पारोळा येथील हरिश्चंद्र पाटील यांनी गट शेतीतील कपाशी न्युयार्कला आम्ही निर्यात करतो असे सांगितले.जळगाव तालुक्यातील करंज येथील शेतकरी यांनी एक गाव एक वाण ही भूमिका राबवून चांगले उत्पन्न मिळवतो असे सांगितले.
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करा
पाशा पटेल म्हणाले की, एकट्या शेतकºयाला मुबलक प्रमाणात चांगले उत्पादन घेणे शक्य नसल्याने मोठया प्रमाणात सामुहिक शेती, गटशेती करण्यावर भर देण्यात येत आहे. या कार्यशाळेला आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जि.प. उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी शास्त्रज्ञ डॉ.बी.डी. जडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्ष लोखंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.
आत्महत्या स्लॅबच्या घरात रहाणारा शेतकरीच करतो
आपण केंद्राच्या सूचनेवरून शेतकºयाने आत्महत्या केलेल्या काही गावांना भेटी दिल्याचे पाशा पटेल म्हणाले. ज्या शेतकºयांच्या घरावर स्लॅबचे छत होते तेथेच भिंतीवर मयत शेतकºयाचा फोटो दिसला. एकाही झोपडीतील शेतकºयाने आत्महत्या केली असे आढळले नाही. याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, कापूस इतरांकडून घेऊन तो विक्रीस काही जण नेतात मात्र भाव न मिळाल्याने नंतर मनस्ताप होऊन तो आत्महत्या करतो असेही प्रकार आढळून आले. मात्र अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी आपण आज येथे चर्चा करणार आहोत.
मी सरकारमध्ये बसून सोल्यूशन देतोय... माझा शेतकºयांप्रती असलेला कळवळा कमी झालेला नाही. विरोधी पक्षात असताना आरोप करावा लागतो. तर सरकारमध्ये आल्यावर सोल्यूशन द्यावे लागते. मी आता सरकारमध्ये बसून सोल्यूशन देण्याचे काम करत आहे. संघर्षाचे रुपांतर आता सोल्यूशनमध्ये झाले आहे. माझी शेतकºयांविषयी असलेली भावना पूवीर्चीच आहे आणि मरेपर्यंत तीच राहील, असेही पाशा पटेल म्हणाले.ं