गव्हाचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Published: March 6, 2017 12:27 AM2017-03-06T00:27:43+5:302017-03-06T00:27:43+5:30

कापडणे : कापडणे व परिसरात सध्या गहू काढणीचा हंगाम सुरू आहे.

The farmers are facing problems due to the drop in wheat prices | गव्हाचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

गव्हाचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

Next

कापडणे : कापडणे व परिसरात सध्या गहू काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, नवीन उत्पादित गव्हाला खूपच कमी भाव मिळत असल्यामुळे  येथील शेतकरी गहू  बाजारपेठेत विक्रीसाठी न नेता  साठवणूक करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्यावर्षी पाऊस कमी झाला. परिणामी, येथील शेतकºयांना  चांगला रब्बी हंगाम घेता आला नाही. दरवर्षी पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे शेतकरी दहा ते पंधरा एकर जमिनीवर गहू या पिकाची पेरणी करीत होते. मात्र, यंदा पाणीटंचाईमुळे  केवळ एक ते दोन एकरावर गव्हाची लागवड शेतकºयांनी केली आहे.
  रब्बी हंगामातील  गव्हाचे पीक हे तीन ते साडेतीन महिन्यांच्या कालावधीचे असल्याने नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करतांना जी विहीर तीन ते चार तास पाण्याचा उपसा करायची ती विहीर फेब्रुवारी- मार्च महिन्यात थेट अर्ध्या तासावर आली आहे. विहीरी व कूपनलिकांना पुरेसे पाणी नसल्याने गव्हाला अपेक्षित असलेले पाणीही देता आलेले नाही. त्यामुळे कापडणे परिसरातील बहुतांशी सर्वच शेतकºयांचे गहू बारीक झाला आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट आली आहे. पाणी मुबलक राहिल्यास एकरी १२ ते १५ क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळते. मात्र, यंदा रब्बी हंगामात तशी परिस्थिती नसल्याने दर वर्षाच्या तुलनेने यंदा सरासरी पन्नास टक्के उत्पादनात घट झाली आहे. सध्या मोठ्या हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने एकरी १२०० रुपये देऊन गव्हाचे तयार उत्पादित पीक काढले जात आहे. मात्र, यामुळे चारा हाती लागत नसल्याने, काही शेतकरी एक एकरला एक हजार रुपये याप्रमाणे साध्या लहान यंत्राद्वारे उभ्या गव्हाची मशीनद्वारे कापणी करत असून थ्रेशर मशीनने २०० रुपये पोत्याप्रमाणे मळणी काढणीचे काम सुरू आहे.
तुटपुंजा भाव
पाणीटंचाई असल्याने खूपच कमी क्षेत्रफळात  गव्हाची लागवड असून, उत्पादनात निम्यापेक्षा जास्त घट आल्यानेदेखील गव्हाला खूपच कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांची पिळवणूक करण्याची खेळी खेळली जात असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. गव्हाची बाजारपेठेत आवक नसताना व शेतकºयाकडे माल नसताना गव्हाला २२०० ते २३०० रुपये  भाव क्विंटलला मागील आठवड्यात होता. मात्र, आता शेतकºयांचा माल बाजारपेठेत येऊ लागल्यावर एक क्विंटल गव्हाला केवळ १,५०० ते १,६०० रुपये एवढा कमी भाव मिळत आहे. आता तर गहू काढणीला सुरुवात झाली आहे. अशी बाजार भावाची गंभीर परिस्थिती आहे.  अजून  आठवड्याभरानंतर सर्वच शेतकरी गहू काढणीला सुरुवात करतील, तेव्हा बाजारात आवक वाढल्याने पुन्हा १२०० ते १३०० रुपये इतका कमी भाव मिळण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तवली जात आहे.
दररोज गव्हाचे भाव घसरत असल्याने शेतकरी मात्र गव्हाला बाजारपेठेत कमी भावात गहू न विकता त्याला साफ व स्वच्छ करून  गोदामात पोते भरून साठवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु तरीदेखील शेतकरी द्विधा मन:स्थितीत सैरावैरा झालेला दिसत आहे. गहू जर स्वस्त व कमी भावात विकला तर खूपच जास्त तोटा सहन करावा लागणार आहे. दुसरीकडे जर साठवणूक केली तर झालेल्या कर्जाच्या पैशांची परतफेड कशी करायची या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत. म्हणून आपापल्या सोयीनुसार काही शेतकरी कमी भावात गव्हाची विक्री करीत आहेत तर काही साठवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गहू  घेण्यासाठी शेती मशागत बियाणे, खते, निंदणी, खुरपणी, काढणी, कापणी, मळणी, बाजारपेठेत माल नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च, हमाली आदींचा खर्च जास्त असल्याने १,६०० ते १,७०० इतक्या कमी भावात हे पीक घेणे परवडत नाही. खर्चाच्या तुलनेने २,५०० रुपये क्विंटलच्या पुढे गव्हाला भाव असणे अपेक्षित आहे.
-अरुण पुंडलिक पाटील, शेतकरी

Web Title: The farmers are facing problems due to the drop in wheat prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.