शासनाच्या हमीभाव केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:04 PM2019-09-28T12:04:31+5:302019-09-28T12:05:52+5:30

उडीद-मूग उत्पादक १०० शेतकऱ्यांचीच नोंदणी: मुदत वाढीचा प्रस्ताव

Farmers back to government guarantee centers | शासनाच्या हमीभाव केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

शासनाच्या हमीभाव केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

Next

जळगाव : बाजार समितीत हमीभावापेक्षा सुमारे १८०० ते २ हजार रूपये कमी भावाने उडीद, मूग खरेदी सुरू असतानाही शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. ३० सप्टेंबर ही नोंदणीसाठी अंतीम मुदत असतानाही आतापर्यंत तिन्ही खरेदी केंद्रांवर मिळून केवळ १०० शेतकºयांनीच नोंदणी केली आहे.
दरवर्षीप्रमाणे शासनाने जिल्ह्यात उडीद, भूग व सोयाबिनच्या हमीभावाने खरेदीसाठी जळगाव, पाचोरा व अमळनेर येथे केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार या तीन केंद्रांवर माल विक्रीस आणण्यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन नोंदणी होणे गरजेचे आहे.
त्यानुसार आॅनलाईन नोंदणीस सुरूवातही झाली आहे. मात्र ३० सप्टेंबरला ही मुदत संपत असतानाही आतापर्यंत ही तिन्ही केंद्र मिळून केवळ १०० शेतकºयांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
नोंदणीसाठीची मुदत वाढविण्याचा प्रस्ताव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासनाला पाठविण्यात आला आहे.
का फिरविली पाठ?
जिल्ह्यात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष म्हणजे १०-१५ दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने पावसाने हजेरी लावल्याने उडीद, मूग चांगला येऊनही त्याचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे दाण्यांवर डाग पडल्याने दर्जा घसरला आहे. शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर एफएक्यू दर्जाच्याच मालाची खरेदी केली जाते. त्या निकषात आपला माल बसणार नाही, याची खात्री असलेल्या शेतकºयांकडून या केंद्रांवर नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे सांगितले जात आहे.
मागील दोन वर्ष चांगला प्रतिसाद
मागील दोन वर्ष या हमीभाव खरेदी केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाला. मागील वर्षी जिल्ह्यातील या तीन हमीभाव खरेदी केंद्रांवर ९ हजार ६३९ क्विंटल उडीद, ६ हजार १८७ क्विंटल मूग तर ५१० क्विंटल सोयाबिनची खरेदी झाली होती. मात्र यंदा शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

Web Title: Farmers back to government guarantee centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव