पोकलँड चोरट्यांना शेतकऱ्यांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:42 PM2019-03-13T22:42:45+5:302019-03-13T22:42:57+5:30
गलंगी शिवारातील घटना
चोपडा : गलंगी, ता. चोपडा शिवारातून साठ लाख रुपये किंमतीचे पोकलँड मशीन चोरून नेणाऱ्या दोघांना शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन जणांपैकी एक आरोपी फरार झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, शिरपूर येथील पोकलँड मशीन गलंगी शिवारात चारुशीला विजय देवराज यांच्या शेतात उभे होते. १२ रोजी रात्री ते चोरून भवाडे, लासूर, गणपूर शिवारातील दिलीप श्रावण कोळी, शरद आत्माराम कोळी, हरी शिवदास पाटील व अन्य शेतकºयांच्या शेतांमधील मका, गहू इत्यादी उभ्या पिकांचे नुकसान करीत पोकलँड चोरुन नेण्याचा प्रयत्न करीत होते.
याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनेश कमलसिंग जमादार रा. शिरपूर, जि. धुळे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघा आरोपींविरुद्ध भादंवि ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश जगदीश बारेला याला अटक करण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नामदेव महाजन हे करीत आहेत.