शेतकऱ्याचा डीडीआर कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:18 AM2019-02-16T11:18:55+5:302019-02-16T11:19:10+5:30

अंगावर ओतले रॉकेल

Farmer's DDR attempted suicide next to the office | शेतकऱ्याचा डीडीआर कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्याचा डीडीआर कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे सावकाराच्या जाचाला कंटाळून उचलले पाऊल


जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील एका शेतकºयाने सावकाराच्या जाचाला कंटाळून शुक्रवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी सावकारावर कारवाईचे आश्वासन दिल्याने पोलिसांनी शेतकºयास सोडून दिले.
एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील अनेक शेतकºयांनी सावकाराकडून दोन-तीन वर्षांपूर्वी कर्ज घेतले आहे. कर्जाचा मोबदला म्हणून शेतकºयांच्या जमिनी सावकाराने घेतल्या असून, सावकार जास्तीची रक्कम मागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कर्जाची परतफेड होवू न शकल्याने सावकाराकडून शेतक?्यांना त्रास देणे सुरू झाले होते. शिवाय संबंधीत शेतकºयांच्या जमिनी देखील ताब्यात घेवून जादा पैशांची मागणी करत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
जिल्हा उपनिबंधकांशी चर्चा
मराठे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने अधिकारी, कर्मचारी जमले. त्यांनी मराठे यांना अडविले. पोलिसांनाही कळविण्यात आले. जिल्हा उपनिबंधक राठोड यांनी मराठे यांच्याशी चर्चा करीत कारवाईचे आश्वासन दिले.
त्यानंतर पोलिसांनीही समजूत घालून मराठे यांना परत पाठविले. या ठिकाणी रॉकेल सांडल्याने त्यावर माती आणून टाकण्यात आली. रॉकेलचा वास परिसरात पसरला होता.
शेतकरी उत्राण गावातील
शुक्रवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उत्राण येथील डिगंबर चिंता मराठे या शेतकºयाने दुपारी एकच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी गावातील काही शेतकरी देखील उपस्थित होते.
लोकशाही दिनी दिला होता इशारा
सावकाराने जमीन हडप केल्याची तक्रार देऊनही व सावकारी झाल्याचे सिद्ध होऊनही सावकाराविरूद्ध कारवाईस टाळाटाळ होत असल्याने १४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न झाल्यास १५ फेब्रुवारी रोजी आत्महत्या करण्याचा इशारा उत्राण ता.एरंडोल येथील डिगंबर चिंधा मराठे यांनी सोमवार,४ फेब्रुवारी रोजी जिल्हा लोकशाहीदिनी तक्रारीद्वारे दिला होता. मात्र तरीही कार्यवाही न झाल्याने मराठे यांनी आधी जाहीर केल्यानुसार आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Web Title: Farmer's DDR attempted suicide next to the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.