शेतक:यांचे मरण हेच सरकारचे धोरण
By admin | Published: April 22, 2017 03:50 PM2017-04-22T15:50:56+5:302017-04-22T15:50:56+5:30
केंद्रातील भाजपा सरकार शेतक:यांच्या रक्ताचे शोषण करणारे असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा:या शेतक:यांवर गुजरात पोलिसांनी लाठय़ा चालवल्या.
रघुनाथ पाटील यांची टीका : गुजरात पोलिसांनी चालवल्या शेतक:यांवर लाठय़ा; शेतकरी संघटनेतर्फे निषेध
साक्री, जि. धुळे, दि. 22 - शेतक:यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळाव्यात म्हणून गुजरात राज्यातील त्यांच्या गावाला जाऊन शेतकरी रक्तदान करणार होते. परंतु, केंद्रातील भाजपा सरकार शेतक:यांच्या रक्ताचे शोषण करणारे असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा:या शेतक:यांवर गुजरात पोलिसांनी लाठय़ा चालवल्या. याचा शेतकरी संघटना निषेध करत आहे. सरकारचे धोरण शेतक:यांचे ‘मरण’ असल्याचे सांगत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
आमदार बच्चू कडू यांची आसूड यात्रा गुजरात राज्याच्या सीमेवर अडवल्यानंतर रघुनाथ पाटील हे साक्री मार्गाने माघारी येत होते. साक्री येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला दुपारी त्यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी तालुकाप्रमुख विशाल देसले यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी ते ‘लोकमत’शी बोलत होते.
या वेळी रघुनाथ पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका केली. देशात 31 वर्षानंतर एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे. पूर्वीच्या राजकत्र्याप्रमाणेच हे सरकारही शेतकरी विरोधी आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे सरकार शेतक:यांचा बळी द्यायला निघाले आहे. देशात निर्माण होणा:या साखरेपैकी 80 टक्के साखर उद्योगासाठी वापरली जाते. त्यातील उद्योगपतींचा तोटा होऊ नये, म्हणून शेतक:याच्या उसाला कमी भाव दिला जातो. कापूस उत्पादनाचा सर्वात मोठा फायदा कापड उद्योगांना होतो, त्यामुळे कापासाचे भाव ठरवून पाडले जातात.
भारत सरकार शेतकरी विरोधी असतानाही राज्यात झालेल्या जि.प., पं.स., महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकीत बहुमत मिळाले आहे. या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की लोकांसमोर दुसरा पर्यायच नाही, आजर्पयत जे सत्तेवर होते. त्यांनी ही शेतकरी विरोधी धोरण राबवले. त्यामुळे शेतक:यांनी कोणावर विश्वास ठेवायचा, शेतकरी संघटित नसल्याचा फायदा राज्यकर्ते उचलतात जे नेते शेतकरी आंदोलनात मोठे झाले. त्यांना सत्तेची गाजरे दाखविण्यात आली, असे त्यांनी सांगत आता हेच नेते सरकारची बाजू घेऊन बोलतात, हे शेतक:यांचे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले.
आसूड यात्रा काढणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रामाणिकपणे शेतक:यांची बाजू उचलून धरली आहे.
त्यांच्या आसूड यात्रेला शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे, म्हणून संघटना त्यांच्यासोबत आहे. शेतक:यांना कर्जमाफी नको आहे. तर त्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव हवा आहे, तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या तर राज्यात कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीवरही टिका
कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने काढलेल्या संघर्ष यात्रेवर त्यांनी सडकून टीका केली. जे आजर्पयत सत्तेवर होते. त्यांनी शेतक:यांसाठी काहीच केले नाही. त्यांना आता शेतक:यांचा कळवळा आल्याचे ते म्हणाले. या वेळी शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागप्रमुख दिनकर दाभाडे, मुंबई विभागप्रमुख गणेश घुगे, युवा आघाडी प्रमुख शंकर गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र संघटक अॅड. अविनाश पाटील उपस्थित होते.