शेतक:यांच्या मागण्यांसाठी पाचो:यात काँग्रेसचा रास्तारोको
By Admin | Published: June 9, 2017 04:18 PM2017-06-09T16:18:55+5:302017-06-09T16:18:55+5:30
शेतकरी संपाला पाठिंबा देत पाचो:यात जारगाव चौफुलीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे साडे अकरा वाजेच्या दरम्यान रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
पाचोरा,दि.9 : शासनाने शेतक:यांचा 7/12 कोरा करावा आदी शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संपाला पाठिंबा देत पाचो:यात जारगाव चौफुलीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे साडे अकरा वाजेच्या दरम्यान रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, कर्जमुक्ती झालीच पाहिजे, 7/12 उतारा कोरा झालाच पाहिजे , यासह शिवसेनेच्या दुटप्पीपणाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष अॅड.अभय पाटील, साहेबराव पाटील, शेख इस्माईल, फकिरा प्रताप पाटील, अॅड. अविनाश भालेराव, सचिन सोमवंशी, डी. जी. पाटील, अरूण महाजन, नंदकुमार सोनार, शेख रसूल उस्मान, मुक्तार शहा, अनिल पाटील, सदाशिव पाटील, मंगेश गायकवाड, सुनील निकम, शरीफ खाटीक, शशीकांत पाटील, भास्कर व्यवहारे आदी कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. चौफुलीवर 17 मिनिटे घोषणाबाजी वाहनांना थांबविण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. डीवायएसपी केशव पातोंड, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, उपनिरीक्षक सचिन सानप, साहाय्यक निरीक्षक अविनाश आंधळे यांचेसह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांना मागण्यांचे निवेदन आंदोलकांकडून देण्यात आले.