अमळनेर येथे कजर्माफीसाठी शेतकरी धडकले प्रांत कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 01:03 PM2017-04-07T13:03:20+5:302017-04-07T13:03:20+5:30
शासन विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या मोर्चाचे नेतृत्व शेतक:यांनीच केले होते.
अमळनेर, जि. जळगाव, दि. 7 - शेतक:यांना कर्जमाफी देत त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, हवामान आधारित विमा संकल्पना योजना राबवावी, पंतप्रधान विमा योजना बंद करावी यासह विविध मागण्यांसाठी आज शेतक:यांतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासन विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या मोर्चाचे नेतृत्व शेतक:यांनीच केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज नाटय़संकुलापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी दोन बैलगाडय़ा होत्या. विविध घोषणा देत हा मोर्चा स्टेशनरोड मार्गे प्रांत कचेरीवर धडकला. विधानभवन परिसरात शेतक:याला झालेल्या मारहाणीचा या वेळी निषेध करण्यात आला.
यावेळी शेतकी संघाचे अध्यक्ष संजय पाटील, जि.प.चे माजी सदस्य शिवाजी दौलत पाटील, कृउबाचे माजी संचालक धनगर दला पाटील, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतक:यांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.