कापसाचे भाव वाढूनही शेतकऱ्यांचा नशिबी निराशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:14 AM2019-03-25T11:14:13+5:302019-03-25T11:15:39+5:30
जिनर्सने थांबवली खरेदी
जळगाव : संपूर्ण हंगाम कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री न करणाºया शेतकºयांना आता भाव वाढल्यावर देखील निराशाच पदरी पडत आहे. कापसाचे दर ६ हजार रुपयांपर्यंत गेल्यावर जिल्ह्यातील अनेक जिनर्सनी खरेदी थांबवली आहे. शेतकºयांना आता व्यापाºयांना कमी भावात कापूस विक्री करावा लागत असल्याचे चित्र आहे. जिनर्स व व्यापाºयांचा या खेळीमुळे शेतकºयांना भाव वाढूनही फायदा होताना दिसून येत नाही.
सप्टेंबर २०१८ मध्ये यंदाच्या कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. सुरुवातीचे काही दिवस बाजारात कापूस नसताना भाव हे ६ हजार रुपयांपर्यंत होते. मात्र, आॅक्टोबर अखेरपर्यंत नवीन कापूस बाजारात आल्यानंतर कापसाचे भाव ५५०० पर्यंत आले. भविष्यात भाव वाढतील या अपेक्षेने शेतकºयांनी आॅक्टोबर ते जानेवारीपर्यंत विक्रीसाठी माल बाजारात आणलाच नसल्याने बाजरात मंदीचे सावट होते. आंतराष्टÑीय बाजारात सरकीला भाव नसल्याने कापसाला मागणी नसल्याने भावात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, आता मार्चच्या दुसºया आठवड्यापासून कापसाच्या भावात वाढ झाल्यावर शेतकºयांकडून माल विक्रीसाठी आणला जात असताना, जिनर्सकडून कापूस खरेदीस नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव आपला माल व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे.
जिनर्स व व्यापाºयांचे साटेलोटे
कापसाचे भाव सध्या ५८०० ते ६१०० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी जिनींगवर कापूस विक्रीसाठी गर्दी केली. मात्र, जिनर्सने खरेदी थांबवली आहे. त्यामुळे घरात कापूस असूनही खरेदीदार नसल्याने शेतकºयांवर संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत गावोगावी जाणाºया व्यापाºयांकडूनही जो माल खरेदी केला जात आहे. त्या मालाला ५५०० ते ५६०० रुपयांपर्यंतचे भाव निश्चित करण्यात आले आहेत. जिनर्स कापूस खरेदी नकार देत आहेत आणि ६१०० रुपये भाव असताना तब्बल ४०० ते ५०० रुपये कमी दराने शेतकºयांना माल विक्री करावा लागत आहे. शेतकºयांकडून ५५०० ते ५६०० रुपयांमध्ये खरेदी केलेला माल व्यापारी जिनर्सला ५८०० रुपयांपर्यंत देत आहेत. यामध्ये व्यापारी व जिनर्सला लाभ मिळत असून, शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे.
शेतकºयांकडे कापूस पडलेलाच
मार्च महिन्यात शेतकºयांकडील कापूस जवळ-जवळ विक्री होवून गेलेला असतो. यावर्षी मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. यंदा बºयाच शेतकºयांनी जानेवारीपर्यंत आपला माल विक्रीच केला नव्हता. फेब्रुवारी महिन्यात भाव वाढीच्या अपेक्षा भंग झाल्यानंतर बºयाच शेतकºयांनी कापूस विक्री केला. मात्र, पुन्हा भावात घसरण होवून हमीभावापेक्षाही कमी दरात कापूस खरेदी केला जात असल्याने मार्च अखेरपर्यंत भाव वाढतील या अपेक्षेने कापूस विक्री केला नव्हता. आता भाव वाढल्यामुळे शेतकºयांकडून कापूस विक्री केला जात आहे. दरम्यान, अजून काही दिवस कापसाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.