शेतक:यांचा दुष्काळ निधी खुंटला
By admin | Published: February 23, 2016 01:03 AM2016-02-23T01:03:19+5:302016-02-23T01:03:19+5:30
एरंडोल तालुक्यातील लाभार्थीची संख्या वाढल्याने हा निधी खुंटला असून याबाबत तहसीलदारांनी जिल्हाधिका:यांकडे वाढीव रकमेची मागणी केली आह़े
एरंडोल : दुष्काळग्रस्त शेतक:यांसाठी शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले आह़े मात्र एरंडोल तालुक्यातील लाभार्थीची संख्या वाढल्याने हा निधी खुंटला असून याबाबत तहसीलदारांनी जिल्हाधिका:यांकडे वाढीव रकमेची मागणी केली आह़े तालुक्यात सहा हजार 744 लाभार्थी शेतकरी आहेत़ शासनाकडून तालुक्यासाठी पाच कोटी 24 लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आल़े हे अनुदान यंत्रणेकडून एक हजार 272 बाधित शेतक:यांना वाटप करण्यात आल़े मात्र रक्कम कमी पडल्याने पाच हजार 372 लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिल़े त्यांच्यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपये आवश्यक आहेत़ ही बाब लक्षात घेता तहसीलदार मीनाक्षी राठोड यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे साडेतीन कोटी रुपये वाढीव अनुदान मिळावे अशी मागणी केली आह़े लाभार्थीना त्यांच्या बँक खात्याद्वारे अनुदान वितरित केले जात आह़े पिकांच्या क्षेत्रफळानुसार हे अनुदान दिले जात आह़े शेतक:यांनी आपले बँक खाते क्रमांक तलाठय़ांकडे द्यावे, असे आवाहन राठोड यांनी केले आह़े अनुदान वितरणासाठी नायब तहसीलदार व्ही.जी. वैद्य आणि सी.बी. देवराज परिश्रम घेत आहेत़ तर प्रशासनाने शेतक:यांची समस्या लक्षात घेत वंचितांना अनुदानाचे तत्काळ वितरण करावे, अशी मागणी लाभार्थीकडून होत आह़े (वार्ताहर)