नोंदणीप्रमाणेच शेतकऱ्यांचा माल मोजमाप होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:43+5:302021-06-10T04:12:43+5:30
पारोळा येथील कासोदा रोडवरील शासकीय गोदामात सकाळी ११ वाजता शासकीय भरड धान्य खरेदीचा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
पारोळा येथील कासोदा रोडवरील शासकीय गोदामात सकाळी ११ वाजता शासकीय भरड धान्य खरेदीचा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भरड धान्य खरेदीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडुबापू पाटील, बाजार समितीचे संचालक चतुर भाऊसाहेब, मधुकर पाटील, प्रा. बी. एन. पाटील, डॉ. पी. के. पाटील, डॉ. सुनील पाटील, सचिव रमेश चौधरी, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, शेतकी संघाचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष सखाराम चौधरी, संचालक भिकन महाजन, राजेंद्र पाटील, नाना पाटील, सुधाकर पाटील, जिजाबराव बापू पाटील, पोपट चव्हाण, दासभाऊ पाटील, चेतन पाटील, व्यवस्थापक भरत पाटील, शंतनू पाटील, बापू मराठे, पंकज मराठे, विकास बोरसे, सतीश महाजन, तसेच पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती व पारोळा शेतकी संघाचे कर्मचारी उपस्थित होते.