शेतकऱ्यांना गणपती 'बाप्पा' पावला, कापसाला मिळाला १६ हजाराचा भाव 

By चुडामण.बोरसे | Published: August 31, 2022 06:52 PM2022-08-31T18:52:42+5:302022-08-31T18:54:36+5:30

सातगाव डोंगरी ता. पाचोरा येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी १४ हजार ७७२ रुपये भावाने कापूस खरेदी केला.

Farmers got relief, cotton got price of 16 thousand in jalgaon | शेतकऱ्यांना गणपती 'बाप्पा' पावला, कापसाला मिळाला १६ हजाराचा भाव 

शेतकऱ्यांना गणपती 'बाप्पा' पावला, कापसाला मिळाला १६ हजाराचा भाव 

googlenewsNext

चुडामण बोरसे

जळगाव   : जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना जणू बाप्पाच पावला. बोदवड येथे कापसाला चक्क १६ हजार रुपये तर सातगाव डोंगरी ता.पाचोरा येथे १४७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. पांढऱ्या सोन्याचे नंदनवन असलेल्या बोदवड तालुक्यात बुधवारी कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यात खरेदीच्या शुभ मुहूर्तावर सोळा हजाराचा भाव देण्यात आल्याने कापसाची यंदाची सुरुवात जोरदार झाली.  वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यात १६ हजाराचा भाव मिळाला.

सातगाव डोंगरी ता. पाचोरा येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी १४ हजार ७७२ रुपये भावाने कापूस खरेदी केला. पहिल्या दिवशी ६७ किलो कापूस खरेदी झाला. धरणगाव येथे श्री जिनिंगमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली. मुहूर्ताचा भाव यावेळी ११ हजार १५३ रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.  पहिल्याच दिवशी मुहूर्तावर साधारण एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.  धरणगाव तालुक्यातील जीनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात होत असते. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह  जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी आदी उपस्थित होते. याशिवाय बाळद ता. पाचोरा, कासोदा ता. एरंडोल आणि कजगाव ता. भडगाव येथेही कापूस खरेदी सुरु झाली आहे.

असा मिळाला भाव (क्विंटलप्रमाणे) 

बोदवड : १६००० रुपये 
सातगाव डोंगरी  : १४७७२ रुपये 
बाळद : ११५५१ रुपये
धरणगाव :  १११५३ रुपये
कासोदा : ११०११ रुपये
कजगाव : ११०००रुपये

Web Title: Farmers got relief, cotton got price of 16 thousand in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.