हातेड येथे शेतक:यांचा रास्तारोको
By admin | Published: June 7, 2017 01:28 PM2017-06-07T13:28:17+5:302017-06-07T13:28:17+5:30
विविध मागण्या : महामार्गावर वाहतूक ठप्प
Next
ऑनलाईन लोकमत
चोपडा,दि.7- शेतक:यांचा 7/12 कोरा करावा, वीजबिल माफ करावे, खतावरील अनुदान वाढवावे आदी मागण्यांसाठी किसान क्रांती शेतकरी कृती समितीतर्फे आज अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील हातेड बुद्रुक येथे आज रास्तारोको करण्यात आला. यावेळी शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या.
सकाळी 10 ते 11 यावेळेत शेतक:यांनी रास्तारोको केले. रस्त्यावर टायर टाकून त्यावर चारा ठेवून तो जाळला होता. रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी शेतकरी कृती समितीचे प्रवर्तक एस. बी.पाटील, संजीव हिरामण सोनवणे,संजीव बाविस्कर यांच्यासह शेतक:यांनी सहभाग घेतला.