शेतकऱ्यांचा दसरा हसरा, कांद्याचे ‘सीमोल्लंघन’; शुभारंभालाच लाल कांद्याला ११ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 09:38 AM2023-10-25T09:38:38+5:302023-10-25T09:39:42+5:30

शेतकऱ्यांचा दसरा हसरा झाला.

farmers happy on dasara 11 thousand rate for red onion at the very beginning | शेतकऱ्यांचा दसरा हसरा, कांद्याचे ‘सीमोल्लंघन’; शुभारंभालाच लाल कांद्याला ११ हजार

शेतकऱ्यांचा दसरा हसरा, कांद्याचे ‘सीमोल्लंघन’; शुभारंभालाच लाल कांद्याला ११ हजार

जिजाबराव वाघ, लोकमत न्यूज नेटवर्क, चाळीसगाव :  गेल्या काही महिन्यांपासून कोसळलेल्या कांद्याने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दरवाढीचे सीमोल्लंघन केले. सोमवारी ४,३२८ प्रतिक्विंटल असे सर्वोच्च लिलाव येथील बाजार समितीत पुकारले गेले. यामुळे शेतकऱ्यांचा दसरा हसरा झाला.

यंदा दुष्काळ, विषम हवामानामुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला. मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात लिलावही थांबले होते. परिणामी भाव घसरले होते. लासलगाव बाजारातही कांद्याचे दर एकाच आठवड्यात ३७ टक्क्यांनी वाढले व भाव २३ रुपयांवरून ३२ रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात कांदा भाव खात आहे.

शुभारंभालाच लाल कांद्याला ११ हजार

नाशिक : देवळा येथील खारी फाटा बाजार मार्केटमध्ये नवीन लाल कांदा लिलावात मुहूर्ताच्या कांद्याला सर्वोच्च ११,१११ रुपये, तर उमराणे बाजार समितीत ९,१११ रुपये भाव मिळाला आहे.

 

Web Title: farmers happy on dasara 11 thousand rate for red onion at the very beginning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.