जामनेर तालुक्यातील पाळधी येथे महामार्ग शेतकऱ्यांनी पाडला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 05:53 PM2019-07-21T17:53:03+5:302019-07-21T17:58:50+5:30

जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम करताना पाळधी, ता.जामनेर गावाजवळ पूल तयार करताना पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु या पर्यायी मार्गाजवळ पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने रात्री झालेल्या पावसाचे पाणी थेट शेतात घुसले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी या महामार्गावरील वाहतूक बंद पाडली.

The farmers of Jamnar taluka have gone off the highway | जामनेर तालुक्यातील पाळधी येथे महामार्ग शेतकऱ्यांनी पाडला बंद

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे महामार्ग शेतकऱ्यांनी पाडला बंद

Next
ठळक मुद्देसंताप : जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम संथ गतीनेरस्ता कॉक्रीटीकरण शेतकऱ्यांसाठी ठरतोय डोकेदुखीठेकेदारांच्या अपुºया कामामुळे शेतात साचले पाणी

विनोद कोळी
पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम करताना पाळधी, ता.जामनेर गावाजवळ पूल तयार करताना पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु या पर्यायी मार्गाजवळ पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने रात्री झालेल्या पावसाचे पाणी थेट शेतात घुसले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी या महामार्गावरील वाहतूक बंद पाडली.
जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पाळधी येथून नेरीकडे रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. पाळधीपासून नेरीकडे एक कि.मी. अंतरावर गेल्या सात-आठ महिन्यांपासून पुलाचे संथ गतीने सुरू असलेले काम शेतकºयांसाठीसुद्धा डोकेदुखी झाली आहे. पुलाजवळ वाहनांसाठी कुमकुवत पर्यायी मार्ग बनविण्यात आला आहे. त्यात पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, अशी व्यवस्था केलेली नसल्याने शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने आजूबाजूच्या दत्तू विठ्ठल माळी, रामलाल डोंगरे यांच्यासह अनेक शेतकºयाच्या शेतात पाणी साचले व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी हा पर्यायी रस्ता अडविला व महामार्गावरील वाहतूक बंद केली.
या प्रकारची घटना मागील महिन्यात जोरदार पाऊस झाला तेव्हासुद्धा झाली होती व शेतात पाणी साचले होते. त्यावेळीदेखील या शेतकºयांनी अनेक तक्रारी केल्या व लवकरात लवकर पुलाचे बांधकाम पूर्ण करावे व पिकांचे नुकसान थांबवावे, अशी मागणी केली होतीे. परंतु ठेकेदाराने याची कोणतीही दखल घेतली नाही. उलट गेल्या १५ ते २० दिवसांपासून थोडे फार सुरू असलेले कामसुद्धा मजुरांचे थकीत वेतन न दिल्याने बंद पडलेले आहे. याबाबत वर्तमानपत्रात बºयाच बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु त्याचा कोणताही परिणाम कामावर झाल्याचे दिसून येत नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. म्हणून सर्व शेतकºयांनी याठिकाणी दोन तास रस्ता वाहतूक बंद केलीे व जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

Web Title: The farmers of Jamnar taluka have gone off the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.